A damaged car after a horrific accident on the Delhi-Mumbai Expressway, highlighting the impact of high-speed collisions while confirming no loss of life.

 

esakal

Trending News

Delhi-Mumbai Expressway Accident VIDEO : काळ आला होता, पण..! दिल्ली-मुंबई महामार्गावर भरधाव कार ५० मीटरपर्यंत उलटली तरीही सर्वजण सुखरूप

Car crash on Delhi-Mumbai Expressway : या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे; घटनास्थळी हजर स्थानिकांनी धाव घेत केली मदत

Mayur Ratnaparkhe

Delhi-Mumbai Expressway Accident : हरियाणाच्या नूंह जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे वर रविवारी सायंकाळी उशीरा एक अतिशय भीषण रस्ते अपघात घडला. जेव्हा दिल्लीच्या दिशेने येणारी एक अतिशय वेगवान कार फिरोजपूर झिरका ठाणे क्षेत्रातील महू चोपडा गावाजवळ अचानक अनियंत्रित झाली. 

भरधाव वेगातील ही कार अनियंत्रित झाल्यानंतर ५० मीटरपर्यंत अनेकदा उलटी-पालटी होत एक्स्र्प्रेस वेच्या लगतच्या ग्रीन बेल्टमध्ये घुसली. ज्यामुळे कारच्या चहुबाजूंनी धुळीचा मोठा लोट निर्माण झाला आणि कार काही क्षण दिसनाशीही झाली. यावेळी कारमध्ये एकाच परिवारातील सदस्य होते, जे दिल्लीवरून जयपूरला निघाले होते. यामध्ये तीन महिला, एक लहान मुलगी आणि एका पुरूषाचा समावेश होता.

या भयानक अपघातात कारच्या मागील बाजूचे प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे मागील सीटवर बसलेल्या व्यक्ती काही काळ आतच अडकल्या होत्या. तर घटनास्थळी उपस्थित लोकांना तत्काळ कारकडे धाव घेतली आणि कारमधील व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर कारमधील सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात त्यांना यश आले.

सुदैवाने या अतिशय भीषण अपघातात कुणालाही कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे कार इतक्यावेळेस महामार्गावर उलटूनही कारमधील कुठलीही जीवितहानी झाली नाही किंवा कारचा स्फोट होवून आग लागल्याचे घटना घडली नाही.

यामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांमधून आश्चर्यच व्यक्त होते आणि याबरोबरच प्रत्येकजण देवाचेही आभार मानत आहे. काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती, असा हा भीषण प्रसंग होता, ज्याचा व्हिडिओ देखील सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT