Flames engulf the Xiaomi SU7 electric car after it caught fire in the middle of the road, leaving the driver trapped inside due to locked doors.

 

esakal

Trending News

Electric car caught fire Video : भररस्त्यात पेटली इलेक्ट्रिक SUV कार; दरवाजे झाले लॉक अन् ड्रायव्हर जिवंत जळाला!

electric car catches fire in the middle of the road : या भयानक घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे; चालकाला वाचवण्यासाठी लोकांनी जीवतोडून प्रयत्न केला, मात्र...

Mayur Ratnaparkhe

Xiaomi SU7 Electric Car Catches Fire on Busy Road: शाओमी कंपनीच्या एका इलेक्ट्रिक कारला भररस्त्यातच अचानक आग लागली, ज्याचा व्हिडिओ सध्या  सर्वत्र प्रचंड व्हायरल होत आहे. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, या अपघातात चालकाचा कारमध्येच मृत्यू झाला आहे. तर प्राप्त माहितीनुसार ही घटना चीनमधील चेंगदू येथे घडली आहे.

ही भयानक दुर्घटना Xiaomi SU7 या कारच्या बाबत घडली आहे. आधी कार दुभाजकास धडकली आणि त्यानंतर मग या कारने पेट घेतला. यामुळे तांत्रिक बिघाड उद्भवून कारचे सर्व दरवाजेही लॉक झाले. यामुळे कारचालकाला बाहेर पडता आले नाही.

एवढंच नाहीतर तर रस्त्यावरीलही अन्य काही जण जीवाच्या आकांताने कारच्य काचा फोडण्याचा, दार तोडण्याचा प्रयत्न करून कारचालकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना यामध्ये यश आलं नाही. अखेर या जळत्या कारमध्येच कारचालकाचाही जळून मृत्यू झाला.

चिनी मोबाइल निर्माता कपंनी Xiaomiने काही वर्ष आधीच ही कार बाजारात लाँच केली आहे आणि चीनमध्ये या कारची विक्रीही सुरू आहे. एवढंच नाहीतर बंगळुरूमधील एका मोबाइल इव्हेंट दरम्यान Xiaomi SU7 ही कार सादर केली होती. मात्र ही कार अद्यापपर्यंत भारतात लाँच झालेली नाही.

या घटनेमुळे इलेक्ट्रिक कारच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. सोशल मीडियावर अनेकजण या घटनेवरून कंपनीवर राग व्यक्त करत आहेत. अनेकांनी दुर्घटनेस आणि कार चालकाच्या मृत्यूस कंपनीला जबाबदार ठरवले आहे. कारच्या आता सुरक्षा उपकरणं आणि सामान असायला हवं, ज्याने दुर्घटना घडल्यानंतर कारची काच फोडता येईल किंवा दार उघडता येईल, असंही अनेकांनी मत व्यक्त केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ

IND vs NZ: अभिषेक शर्माने का पूर्ण केली उपकर्णधार अक्षर पटेलची ओव्हर? पहिल्या T20I असं काय घडलं, जाणून घ्या

Bus-Tanker accident : राष्ट्रीय महामार्गावर बस अन् टँकरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जखमी

IND vs NZ, 1st T20I: १४ षटकार अन् २१ चौकार... भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या! जाणून घ्या कोणते विक्रम रचले

Baramati Elections : बारामतीत उमेदवार यादी जाहीर; जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय गणिते बदलली

SCROLL FOR NEXT