Interesting Train Facts
Interesting Train Facts esakal
Trending News

Interesting Train Facts : बाबो! एवढं असतं रेल्वेच्या चाकाचं वजन? कधीतरी उचलायला जाल आणि...

Pooja Karande-Kadam

Interesting Facts about Train : रेल्वे भारतातल्या प्रत्येक लहान मुलाला देखील ओळखीची वाटते. कारण, अगदी आपल्या अंगाई गाण्यातही रेल्वेच्या गाडीचा उल्लेख असतो. हीच गाण्यातली रेल्वे आता मोठ्या शहरांतील लोकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. मुंबई सारख्या ठिकाणी तर रेल्वे बंद असली की लोकांना सुट्टी मिळते.

रेल्वेतून प्रवास करायला कोणाला आवडत नाही. ट्रेनमध्ये कंटाळा आलेला क्वचितच कोणी असेल. पण, रेल्वेशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीत नाहीत. आज आम्‍ही तुम्‍हाला भारतीय रेल्‍वेबद्दल अशी माहिती देणार आहोत. जिच्‍याबद्दल तुम्‍हाला क्वचितच माहिती असेल.

ही माहिती रेल्वेच्या चाकाला जोडलेली असते. हे बघायला खूप जड वाटतं, पण त्याचं वजन किती आहे हे लोकांना कळत नाही. प्रवासी घेऊन जाण्याबरोबरच भारतीय रेल्वे मालवाहतूक वाहक म्हणूनही काम करते.

हजारो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेणाऱ्या रेल्वेच्या चाकाचे वजन किती असते, हे कधी तुमच्या मनात आले आहे का? याबद्दलच आज जाणून घेऊयात.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) नुसार, ट्रेनचे इंजिन आणि कोच वेगवेगळ्या वजनाची चाके बसवलेले आहेत. त्याचे वेगवेगळ्या डब्यानूसार वेगवेगळे वजन असते. नक्की हा काय विषय आहे पाहुयात.

रेल्वेची चाकं तयार होताना

एलएचबी कोच

लाल रंगाच्या एलएचबी कोचच्या एका चाकाचे वजन अंदाजे 326 किलो असते. तर, ब्रॉडगेजवर धावणाऱ्या सामान्य गाड्यांच्या डब्यात बसवलेल्या चाकाचे वजन 384 ते 394 किलो इतके असते. तर, ईएमयू ट्रेनमध्ये डब्यातील एका चाकाचे वजन सुमारे 423 किलो असते.

इंजिनाच्या चाकाचे वजन वेगळे असते?

इंजिनच्या चाकाचे वजन डब्यांपेक्षा वेगळे असते. इंजिनमध्ये बसवलेल्या चाकाचे वजन डब्यांपेक्षा जास्त असते. हे सर्वज्ञात सत्य आहे की इंजिनचे वजन जास्त आहे म्हणून त्याच्या चाकाचे वजन देखील जास्त आहे. नॅरो गेज ट्रेन इंजिनच्या एका चाकाचे वजन 144 किलो आहे. मीटर गेजवर चालणाऱ्या इंजिनच्या एका चाकाचे वजन 421 किलो असते.

इतके वजन असूनही रेल्वेचे चाक घसरते

डिझेल इंजिनच्या एका चाकाचे वजन सुमारे 528 किलो असते. त्याच वेळी, इलेक्ट्रिक इंजिनच्या एका चाकाचे वजन 554 किलो आहे. या रेल्वेचे चाक एखाद्याच्या अंगावर पडले तर त्याची अनेक हाडे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळेच कधी रेल्वेचं चाक दिसलं तर उचलायचं धाडस करू नका.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT