Viral Video of Dog
Viral Video of Dog esakal
Trending News

Viral Video: अरे हालो! गरब्याच्या तालावर तिच्याबरोबर कुत्राही थिरकला, बघा भन्नाट व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

Viral Dog Garba Video: नवरात्रीमध्ये तुम्हाला ठिकठिकाणी गरबा दांडियासाठीच्या खास कार्यक्रमांचा जल्लोश दिसून येतो. तरूण आणि तरूणींना तर गरबा दांडियाचं विशेष वेड असतं. मात्र एखाद्या प्राण्यालाही गरब्याचं तेवढंच वेड असू शकतं याचा विचार देखील एखाद्याच्या मनात क्वचितच येईल. होय! सोशल मीडियावर व्हायरल झालेला कुत्र्याचा भन्नात व्हिडिओ बघून तुम्हालाही गरब्याच्या तालावर नाचायची इच्छा होईल.

गरब्याच्या तालावर थिरकताना तुम्ही अनेक तरूण तरूणी बघितले असतील. पण गरब्याच्या तालावर कुत्र्यासोबत थिरकताना तुम्ही पहिल्यांदाच बघाल. एक मुलगी त्याच्या गोल्डन रिट्रीव्हर कुत्र्यासह गरब्याच्या तालावर दंग होऊन नाचत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय.

भन्नाट व्हायरल होणारा हा व्हिडिओ मुंबईच्या एका घरातील असल्याचं कळतंय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओतील मुलगी ही डॉग लव्हर असून ती तिच्या गोल्डन रिट्रीव्हर डॉगसह नाचण्यात धुंद असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

'द गुज्जु फॅमिली' असे या तरूणीने व्हिडिओचे कॅप्शन दिलेय. डॉग लव्हर्स हा व्हिडिओ बघून प्रचंड खुश झालेत. तर अनेकांनी कुत्र्याला गरब्याच्या तालावर थिरकताना बघून आम्हालाही गरबा करावासा वाटतो असेही म्हटले आहे. अनेक नेटकऱ्यांनी गुजराती भाषेत या व्हिडिओवर कमेंट केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT