Motivational Story Sakal
Trending News

Inspirational Story: आयआयटीची तयारी, मग BA, आणि आता...; गोष्ट संकटाने न खचलेल्या एका विद्यार्थ्याची!

अखेर त्याने कोटा सोडलं आणि आपलं क्षेत्रच बदललं आणि पुढे जे काही झालं, ते आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

वैष्णवी कारंजकर

राजस्थानच्या कोटा या कोचिंग हबमध्ये नुकतीच नीट परिक्षेची तयारी करणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या वर्षातली कोटामधली ही २५ वी आत्महत्या असल्याची माहिती आजतकने दिली आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांवर असलेल्या मानसिक ताणाचं ते व्यवस्थापन करू शकले नाही की अशा प्रकारचं पाऊल उचलतात.

दीपक हा विद्यार्थीही कोटा इथं जेईईचा अभ्यास करण्यासाठी गेला. पण काही दिवसांमध्येच त्याला तिथे जुळवून घेणं अवघड होऊ लागलं. त्याचे वडील शेतकरी आहेत, आर्थिक स्थितीही बेताचीच होती. त्यांना डोळ्यासमोर ठेवून दीपक तिथे राहत होता. अखेर त्याने कोटा सोडलं आणि आपलं क्षेत्रच बदललं आणि पुढे जे काही झालं, ते आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

हरियाणामधल्या रेवाडी जिल्ह्यातल्या साबन या गावातून आलेल्या दीपक राठीचे वडील वर्षाला कसेबसे ३ लाख रुपये कमवतात. मुलाला इंजिनीयर बनवायचं हे स्वप्न पाहून त्यांनी दीपकला दहावीनंतर कोटाला पाठवलं. त्यानंतर तिथे तो शिकू लागला, जेईईची तयारी करू लागला. पण तिथली दिनचर्या, जेवण्या खाण्याचे होणारे हाल या सगळ्या गोष्टींमुळे त्याला तिथे करमत नव्हतं.

तिथे फक्त आणि फक्त अभ्यास, मनोरंजन नाही, काही नाही. जर १८ तास अभ्यास केला नाही, तर आयआयटीची परीक्षा पास होणार नाही, असे अनेक विचार यायचे. समजा काही मनोरंजन करावं म्हटलं तर असं तू परिक्षा पास होऊ शकणार नाही, असं आसपासचे लोक म्हणायचे.

दीपकने सांगितलं की, कोटामध्ये अभ्यासाचा ताण इतका होता की, त्या ताणातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थी वेगवेगळे मार्ग शोधायचे. त्यापैकी एक मार्ग म्हणजे नशा करणे. विद्यार्थ्यांना यातून विविध प्रकारची व्यसनं लागायची. अनेक विद्यार्थी तणावामुळे आत्महत्याही करायचे. अखेर २०१३ मध्ये कोटामधून दीपक पुन्हा घरी आला. पुढच्या वर्षी सायन्स सोडून आर्ट्सला प्रवेश घेतला आणि बीए केलं. त्यानंतर दीपकने पायलट व्हायचं ठरवलं.

परिस्थिती बेताचीच असलेल्या दीपकच्या वडिलांनी त्याला विरोध केला नाही, उलट कर्ज काढलं आणि त्याला शिकायला दक्षिण आफ्रिकेला पाठवलं.दीपकने पायलटचं ट्रेनिंग घेतलं आणि आता तो नोकरी करत आहे. त्याचं वर्षाचं पॅकेज आता एक कोटीहूनही अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT