Billinaire Inspirational Success story Sakal
Trending News

Success Story: ६००० रुपये कमावणारा मजुराचा मुलगा झाला भारतातला पहिला क्रिप्टो अरबपती

घरची परिस्थिती इतकी दुर्बल होती की अनेकदा त्यांच्या शाळेची फी भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे, त्यासाठीही संघर्ष करावा लागायचा.

वैष्णवी कारंजकर

स्वतःच्या मेहनतीच्या जिवावर माणूस स्वतःचं आपलं नशीब लिहू शकतो. जेव्हा तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी कठोर मेहनत घेता, तेव्हा तुमच्यासमोर येणारी संकटंही तुमच्या वाटेतून दूर होतात. कारखान्यात काम करणाऱ्या एका सामान्य कामगाराच्या मुलाने ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे.

या मुलाने घरच्या गरिबीमुळे सुरुवातीला ६००० रुपये प्रति महिना पगाराची नोकरीही केली. पण त्यानंतर त्याने एक क्रिप्टो कंपनी स्थापन केली. शार्क टँक कार्यक्रमातले एक शार्क मार्क क्युबन यांना या कंपनीत गुंतवणूकदार बनवलं आणि अशी कामं करून दाखवली, ज्याबद्दल विचार करणंही अशक्य वाटतं. कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगाराचा मुलगा जयंती कनानी हे भारतातल्या पहिल्या क्रिप्टो अरबपतींपैकी एक बनले आहेत आणि जगासाठी प्रेरणास्थान बनले आहेत.

शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नसायचे

गुजरातमधल्या अहमदाबादच्या उपनगरीय भागामध्ये एका छोट्याश्या घरात राहणाऱ्या जयंती यांचे वडील एका हिऱ्याच्या कारखान्यात कामगार होते. घरची परिस्थिती इतकी दुर्बल होती की अनेकदा जयंती यांच्या शाळेची फी भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे, त्यासाठीही संघर्ष करावा लागायचा. त्यावेळी त्यांची इच्छा एवढीच होती की, शिकून मोठं होऊन त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, ज्यामुळे ते आपल्या वडिलांना त्यांचं कर्ज फेडण्यासाठी मदत करू शकतील.

शाळेच्या दिवसांमध्ये त्यांच्या परिवाराकडे शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नसायचे. पण सुदैवाने १० वी, १२ वी ते पास झाले आणि पुढे जवळच्याच नडियाद भागात धर्मसिंह देसाई विश्वविद्यालय नावाच्या एका कॉलेजमध्ये प्रवेश केला. या कॉलेजमधून त्यांनी इंजिनियरिंग केली.

सहा हजार रुपये पगारावर केली नोकरी

'मनी कंट्रोल'सोबत बोलताना जयंती म्हणाले होते,"माझं ध्येय एक चांगली नोकरी मिळवणं आणि माझ्या वडिलांनी आमचं शिक्षण आणि माझ्या बहिणीच्या लग्नासाठी जे कर्ज घेतलं होतं, ते फेडणं हे होतं. त्यामुळे मी पुण्याच्या पर्सिस्टंट सिस्टम्स या कंपनीमध्ये काम करू लागलो. माझा पगार सहा हजार रुपये प्रति महिना इतका होता. माझ्या वडिलांना दृष्टी दोष असल्याने ते हिऱ्यांचा आकार पाहू शकत नव्हते, त्यामुळे त्यांना सेवानिवृत्त व्हावं लागलं. त्यामुळे मला पुढे नोकरी पाहावी लागली आणि सुदैवाने मला नोकरी मिळालीही."

जयंती पुढे म्हणाले होते,"मी इतर बरीच काम करत होतो. मी सुमित मनियार यांच्या स्टार्टअपसोबत काम करू लागलो, या स्टार्टअपने पुढे रुपेक सुरू केलं. त्यानंतर मी हाऊसिंग डॉटकॉम सोबत काम करू लागलो, पुढे मॅटिक सुरू केलं. एकेकाळी मी कर्जात बुडालो होतो. कारण मी लग्न करण्यासाठी कर्ज घेतलं होतं. मी कधी विचारही केला नव्हता की मी एक अरब डॉलरची कंपनी सुरू करेन."

जयंती यांची क्रिप्टो कंपनी पॉलिगॉनची स्थापना २०१७ मध्ये झाली होती. ही कंपनी आधी मॅटिक या नावाने ओळखली जायची. या कंपनीची स्थापना मुंबईच्या चार सॉफ्टवेअर इंजिनियर्सने एकत्र येऊन केली होती. यामध्ये जयंती कनानी, संदीप नेलवाल, अनुराग अर्जुन आणि मिहेलो बजेलिक यांचा समावेश होता. २०२१ मध्ये अरबपती मार्क क्यूबन यांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली.

बिजनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एका वर्षानंतर कंपनीने पॉलिगॉन स्टुडिओचं नेतृत्व करण्यासाठी युट्यूबचे गेमिंग प्रमुख रयान वॅट यांना सहभागी करून घेतलं. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये कंपनीने सिकोइया कॅपिटल इंडिया, सॉफ्टबँक विजन फंड २, गॅलेक्सी डिजिटल, गॅलेक्सी इंटरॅक्टिव्ह अशा ४० हून अधिक उद्योगांकडून ४५० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक मिळवली. सध्या पॉलिगॉन या जयंती यांच्या कंपनीची व्हॅल्यू ५५ हजार कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT