biggest egg in kolhapur sakal
Trending News

Photos: कोल्हापूरातील कोंबडीनं दिलं देशातील सर्वात मोठं अंडं

या अंड्याचं वजन ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल कारण हे अंडं 210 ग्रॅम इतकं आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक अजब गजब गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणाऱ्या असतात. जर कोल्हापूरबाबत बोलायल गेलं की येथील सगळ्याच गोष्टी हटके असतात. मात्र सध्या कोल्हापूरची एक कोंबडी चर्चेचा विषय ठरली. कारण या कोंबडीने सर्वात मोठं अंडं दिलयं. हो, हे खरंय. सध्या या अंड्याचे फोटो सगळीकडे व्हायरल होतंय. (Kolhapur Biggest Egg In India)

ही कोंबडी कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे गावातील आहे. येथील दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्रीमध्ये हे अंडं मिळालंय. विशेष म्हणजे हे अंडं केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्रातील नाही तर चक्क देशातील सर्वात मोठं अडं आहे, असा दावा केला जात आहे.

या अंड्याचं वजन ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल कारण अंडं 210 ग्रॅम इतकं आहे. सामान्यपणे कोंबडीच्या अंड्याचं वजन 70-75 ग्रॅमपर्यंत असतं. त्यामुळे हे अंडं आता सर्वांचेच लक्ष वेधत आहे.

कोल्हापूरातील या अंड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या कोंबडीवर आणि अंड्यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT