Book Mark_Marathi Book Review
Book Mark_Marathi Book Review 
Trending News

Marathi Book Review: 'एक झुंज गोंगाटाशी'

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुस्तक - 'एक झुंज गोंगाटाशी'

लेखक - डॉ. यशवंत ओक

प्रकाशक - राजहंस प्रकाशन

किंमत - ३०० रुपये

भोवताली विविध प्रकाराच्या आवाजांनी आपलं जीवन पूर्णपणे व्यापून टाकलंय. बरं पशू-पक्षांचे, वाऱ्याचे, समुद्राच्या लाटांचे आवाज ऐकू येणं इथपर्यंत ठीक आहे, हे नैसर्गिक आहे. या आवाजांची मानवाला गरजही आहे. पण याशिवाय दररोज असे काही आवाजही आपण ऐकत असतो जे मानवनिर्मित अन् त्रासदायक आहेत. यामध्ये फटाके, वाहनांचे हॉर्न्स, कंपन्यांमधील मशिन्सचे आवाज, भोंग्यांचे, म्युजिक सिस्टिमचे, टीव्हीचे, विमानांचे, अॅम्ब्युलन्स - अग्निशमन दलाची वाहनं आणि पोलिसांच्या गाड्यांचे सायरन, रस्त्याच्या कडेला फळ विकणाऱ्यांकडं असलेल्या रेकॉर्डेड आवाज आदींचा समावेश आहे. हे आवाज नुसते आवाज नाहीत तर गोंगाट आहेत. मानुष्यासह पशू-पक्षांच्या जीवनशैलीवर ते विपरित परिणाम करत आहेत. या आवाजांचा इतका अर्निंबध वापर आणि अतिरेक झाला आहे की त्याविरोधात कडक पावलं उचलावी लागत आहेत.

हायकोर्ट, सुप्रीम कोर्टांनी देखील या गोंगाटांची दखल घेत हे रोखण्याासाठी कठोर अन् महत्वाचे आदेश दिलेत. भारतातील कोर्टांना या मोठ्या समस्येची दखल घ्यायला भाग पाडलंय एका अशा व्यक्तीनं ज्यानं खऱ्या अर्थानं भारतात ध्वनी प्रदुषणाच्या लढ्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. डॉ. यशवंत ओक असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. 'एक झुंज गोंगाटाशी' या पुस्तकाच्या निमित्तानं त्यांच्या कार्याची गरज, आवाका आणि संघर्ष आपल्या सर्वांना कळणं आवश्यक आहे.

डॉ. यशवंत ओक हे मूळचे मुंबईकर पेशानं वैद्यकीय डॉक्टर अन् एक पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. गोंगाट अर्थात ध्वनीप्रदुषणाविरोधात त्यांनी सुमारे ३० वर्षे लढा दिला. या काळात त्यांना प्रदीर्घ अशा ८ कायदेशीर लढाया लढाव्या लागल्या. या लढायांमध्ये पाच जमिनी बळकावण्याच्या आणि अतिक्रमणांविरोधातील आणि तीन ध्वनी प्रदुषणासंदर्भात होत्या. आता तुम्ही म्हणलं ध्वनीप्रदुषणाचा आणि जमिनी बळकवण्याचा काय सबंध? पण मित्रांनो याचा संबंध खूपच खोलवर आहे, त्यामुळेच ध्वनी प्रदुषणाला चालना मिळत गेली अन् त्यानं आता रौद्ररुप धारण केलंय. लेखकानं आपल्या पुस्तकातून अतिक्रमणांचा आणि ध्वनीप्रदुषणाचं नेक्सस कसा असतो? हे अनेक उदाहरणांमधून सविस्तर मांडलं आहे. आपल्याच सोसायटीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणापासून त्यांचा ध्वनी प्रदुषणाविरोधातला लढा खरंतर सुरु झाला आणि एका निर्णायक टप्प्यावर येऊन संपला. खरंतर हा लढा कायदेशीररित्या पूर्ण झाल्याचं भासत असलं तरी ध्वनी प्रदुषणाबाबत अजूनही नवनवी आव्हानं निर्माण होतच आहेत. (Book Review)

लेखक डॉ. यशवंत ओक यांनी पुस्तकाच्या सुरुवातील आपल्या या ध्वनी प्रदुषणाच्या लढ्यात मनापासून साथ दिलेल्या दिवंगत माजी खासदार मधु दंडवते यांच्यासह ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि वकिलांना हे पुस्तक अर्पण केलं आहे. तसंच मदत करणाऱ्या इतरही अनेकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन पुढे दहा पानांची सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. आपल्या ध्वनी प्रदुषाविरोधातील लढ्याची प्रेरणा इथंपासून यासंदर्भात सरकारला कायदे करायला भाग पाडण्यापर्यंतच्या कामाची माहिती पुस्तक रुपानं मांडण्यामागची आपली भूमिका विशद केली आहे. त्यानंतर पुढे विविध १३ प्रकरणांमधून आपल्या ध्वनी प्रदुषणासंबंधीच्या लढ्यातील टप्पे सविस्तर मांडले आहेत. (Latest Marathi Book Review)

पुस्तकातील दुसरं प्रकरण म्हणजे 'माझे कायदेशील लढे' हा या पुस्तकातील अत्यंत महत्वाचा भाग असल्याचं मला वाटतं. कारण यामध्ये अनधिकृत बांधकामांमध्ये बडे व्यापारी, बांधकाम व्यावसायिक अन् स्थानिक राजकीय नेत्यांची तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांची मिलीभगत कशा पद्धतीनं शहरांचं विद्रुपीकरण अन् भविष्य बरबाद करते याची माहिती मिळते. पण जर तुम्ही योग्य अभ्यासासह याविरोधात कायदेशीर लढलात आणि त्यात सातत्य ठेवलं तर सामान्य माणसाची ताकद काय असते हे ही यातून कळतं.

त्यानंतरच्या प्रकरणात जगाला ध्वनी प्रदुषणाची जाणीव कधी आणि कशी निर्माण झाली? तसेच त्यासाठी कसा लढा सुरु झाला?, याबद्दल सांगितलं आहे. 'डेसिबल' या ध्वनी प्रदुषण मोजणाऱ्या एककाचा जन्म सन १९२० मध्ये झाला, त्यामागची कहाणी काय होती? त्यानंतर भारतातील ध्वनी प्रदुषणासंदर्भात न्यायालयांना कशी दखल घ्यावी लागली, त्यानंतर सरकारांना याबाबत कसे कायदे करावे लागले. यामध्ये लेखक डॉ. यशवंत ओक यांचं योगदान काय अन् किती महत्वाचं आहे, हे उलगडतं जातं. शहरीकरण, लोकसंख्यावाढ, औद्योगिकरण, दारिद्य, निरक्षरता, रुढी, परंपरा, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम या सर्व घटकांचा ध्वनी प्रदुषणाशी कसा संबंध आहे? हे देखील यात सविस्तरपणे लेखकानं मांडलं आहे.

पुढील प्रकरणांमध्ये ध्वनी प्रदुषणाचे मानवी आरोग्यावर कशा प्रकारे गंभीर परिणाम होत आहेत, मानवाशिवाय निसर्गातील इतर सजीव घटकांवर काय परिणाम होत आहेत? याचा उहापोह करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढच्या पिढीला ध्वनी प्रदुषणाची समस्या समजावून सांगताना यावर तोडग्यासाठी काय उपक्रम राबवता येतील? अन् प्रत्यक्षात कुठल्या स्वरुपाचे प्रयत्न स्वतः केलेत याची माहिती देखील लेखकानं दिली आहे. शेवटी २१ व्या शतकातील ध्वनी प्रदुषण कशा प्रकारचं आहे, याची तोंडओळखही पुस्कात करुन देण्यात आली आहे.

भारतीय पर्यावरण कायद्यात असह्य होणारा गोंगाट हा केवळ त्रासदायक घटक म्हणूनच दुर्लक्षिला गेला होता. पण याविरोधात डॉ. यशवंत ओक या कृतीशील कार्यकर्त्यानं दिलेल्या मोठ्या कायदेशीर लढ्यामुळं 'नॉईज कन्ट्रोल रुल्स, २०००' हा कायदा भारतात लागू झाला. यामुळं उत्सवी गोंगाटावर निर्बंध आणले गेले, ही दखल घेण्यासारखी गोष्ट असून ज्या प्रत्येकाला गोंगाटाचा त्रास होतो त्याला हे माहिती असणं आवश्यक आहे.

प्रतिक्रिया नोंदवा - amit.ujagare@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT