Marriage unique love story Sakal
Trending News

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची Love Story आली समोर; नवरी सोडून मेहुणीशी घेतले सात फेरे | Marriage

हे प्रकरण नवरीच्या घरच्यांना समजल्यावर नवरदेवाची चांगलीच धुलाई करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

Unique Love Story: लग्न एकीशी ठरलं आणि ऐन लग्नाच्या दिवशी सात फेरे घेतले ते होणाऱ्या बायकोच्या बहिणीशी म्हणजेच मेहुणीशी. अशी स्टोरी आपण कधी ऐकली आहे का? ही घटना घडली आहे बिहारमध्ये. सारण जिल्ह्यातील मांझी येथील भभौली या गावात या प्रकरणावरून चांगलाच वाद झालाय.

अधिक माहितीनुसार, भभौली येथील रहिवाशी असलेल्या रामू बीन यांची मुलगी रिंकू कुमारी हिचा विवाह छपरा शहरातील रतनपुरा बिनटोली येथील रहिवाशी असलेल्या जगमोहन महतो यांचा मुलगा राजेश कुमार याच्याशी ठरला होता. २ मे रोजी हा विवाह होणार होता. पण लग्नाच्या दिवशीच वेगळाच प्रसंग घडला.

लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरीच्या घरी पोहोचला. सासरच्या लोकांनी नवरदेवाचे जंगी स्वागत केले. लग्न झाले, एकमेकांना हार घातला पण परिक्षेसाठी बाहेरच्या शहरात असलेल्या नवरीची बहीण पुतुल कुमारीच्या हा प्रकार लक्षात आला.

पुतुल कुमारी आणि राजेश कुमार यांचे आधीपासूनच प्रेमसंबंध होते. तर आपल्याच बहिणीशी राजेशचा विवाह होणार असल्याचं पाहून पुतुलला राहावलं नाही.

पुतुलने भर लग्नात फोन करून राजेशला धमकी दिली. जर माझ्या बहिणीशी लग्न केले तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली. त्यानंतर हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला.

त्यामुळे नवरीच्या घरच्यांनी नवरदेवाची चांगलीच धुलाई केली. हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि दोन्ही कुटुंबियांनी समजदारीने पुतुल आणि राजेशचा विवाह लावून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT