Bizarre Love Story eSakal
Trending News

Bizarre Love Story : ज्याने चोरला मोबाईल, त्यालाच बनवलं बॉयफ्रेंड! अजब तरुणीची गजब कहाणी

Mobile Thief Love Story : या तरुणीचे फोटो पाहून चोराला तिचा मोबाईल चोरल्याचा पश्चाताप झाला.

Sudesh

Brazil Bizarre : तुमचा मोबाईल जर चोरीला गेला, तर त्या चोराला तुम्ही मनातल्या मनात शिव्यांची लाखोली नक्कीच वाहाल. किंबहुना तो चोर जर समोर आला, तर त्याच्या अंगावरही काही जण धावून जातील. मात्र, एक तरुणी चक्क आपला फोन चोरणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. एवढंच नाही, तर तिने त्याला आपला बॉयफ्रेंडही बनवलं आहे.

हा विचित्र प्रकार ब्राझीलमधून समोर आला आहे. या कपलचा एक इंटरव्ह्यू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये त्यांनी आपली 'लव्ह स्टोरी' सांगितली आहे. इमॅन्युएला असं या तरुणीचं नाव आहे. आपला फोन जेव्हा चोरीला गेला, तो क्षणच आमची 'पहिली डेट' होती, असं या तरुणीने म्हटलं आहे.

इंटरव्ह्यूमध्ये इमॅन्युएला सांगते, "मी अशीच रस्त्याने चालत जात होते. अचानक कोणीतरी माझा फोन चोरून नेला. यावेळीच मी या व्यक्तीला पहिल्यांदा पाहिलं." इमॅन्युएलाचा फोन चोरल्यानंतर या व्यक्तीने तो परत आणून दिला होता. यामागेही वेगळीच कहाणी आहे. (Brazil Couple Viral Video)

चोरालाही आवडली तरुणी

या चोरानेही इंटरव्ह्यूमध्ये आपल्या बाजूची स्टोरी सांगितली आहे. तो म्हणतो, "सिंगल असल्यामुळे मी आधीच वैतागलो होतो. मी तिचा फोन चोरताना तिच्याकडे पाहिलं नव्हतं. मात्र, नंतर फोनमध्ये तिचे फोटो पाहून मला ती खूपच आवडली. एवढ्या सुंदर मुलीचा फोन चोरल्याबद्दल मला पश्चातापही झाला."

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं आपल्याकडे म्हटलं जातं. ब्राझीलमधील या जोडप्याच्या बाबतीतही असंच झालं असावं. या दोघांचं रिलेशनशिप हे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हे रिलेशनशिप कितपत टिकेल, याबाबत नेटकऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीन पिढ्या पक्षाचं काम करतोय, धड नाव लिहिता न येणाऱ्यांना तिकीट; भाजपचे नाराज आक्रमक, पोलीस बोलावण्याची वेळ

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! अखेर महायुती तुटली, भाजप-शिवसेनेत फूट...सत्ता समीकरणे कोलमडणार की विरोधकांची लॉटरी लागणार?

“साहेब, मी नोकरी सोडली अन् तिकीट गद्दारांना?” छत्रपती संभाजीनगरमध्ये निष्ठावंत BJP कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पेट्रोल कॅनसह आक्रमक आंदोलन

Alternative Food Apps : 31 डिसेंबरला Swiggy-Zomato संपामुळे बंद; आता कुठून ऑर्डर करू शकता जेवण? हे आहेत स्वस्तात मस्त पर्यायी ॲप

रामानंद सागर यांना धमकावायला चक्क काठ्या घेऊन गेलेले छोटेसे लव-कुश; दोघांना साप दाखवून केले जायचे सीन

SCROLL FOR NEXT