A rare scene of a lioness guarding the Goddess Temple during Navratri festival.
esakal
lioness guard news : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. सर्वत्र धार्मिक वातावरण असून, देवीचा जागर केला जात आहे. अनेक ठिकाणी रात्री गरबा होत आहे. देवीच्या मंदिरांवर सुंदर सजावट केल्याचे दिसत आहे. अशावेळी एक वेगळा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका सिंहिणीला मंदिराबाहेर शांतपणे विश्रांती घेताना दिसत आहे.
भारतीय वन सेवा अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला हा २७ सेकंदांचा व्हिडिओ गुजरातमधील असल्याचे बोलले जात आहे. मंदिराबाहेर सिंहिणीची आरामशीर मुद्रा पाहून युजर्स दावा करत आहेत की ही सिंहिणी माता मंदिराचे रक्षण करत होती.
हा व्हिडिओ @ParveenKaswan या हँडलने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "किती दिव्य दृश्य! असे दिसते की सिंहिणी मंदिराचे रक्षण करत आहे" हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. काहींना आधी हा बनावट किंवा एआय़च्या मदतीने तयार केलेला व्हिडिओ वाटला. परंतु नंतर हा व्हिडिओ खरा असल्याचे समोर आले आहे.
याशिवाय काही युजर्सनी म्हटले की हा व्हिडिओ वन्यजीव आणि प्रदेशाच्या सांस्कृतिक परंपरांमधील मजबूत संबंध दर्शवितो. काहीजण सांगतात, गीर जंगलात देवीची मंदिरे आहेत आणि या ठिकाणी सिंहांचा मोठ्याप्रमाणात अधिवास असतो. या ठिकाणी वाघ, सिंह सर्रास आढळतात परंतु ते मानवी वस्तीला सहसा हानी पोहचवत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.