Viral news esakal
Trending News

Viral : घरात एकच बल्ब लाईटबिल १ लाख, आजीबाई भिंतीवर धडका घ्यायची राहिली बाकी!

सोशल मीडियामुळे झालेला मोठा फायदा म्हणजे तुमच्यावर झालेल्या अन्याय, अत्याचार याविषयी काही मिनिटांच्या आत तुम्ही सगळ्यांना सांगू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Old Woman 90 Years Shocked Small Hut Light Bill : सोशल मीडियामुळे झालेला मोठा फायदा म्हणजे तुमच्यावर झालेल्या अन्याय, अत्याचार याविषयी काही मिनिटांच्या आत तुम्ही सगळ्यांना सांगू शकता. संबंधित यंत्रणेकडे दाद मागू शकता. या अत्याधुनिक माध्यमावर शेयर झालेल्या त्या बातम्या किंवा पोस्ट यामुळे समाजात एक प्रकारची जागृती होत असल्याचे दिसून आले आहे.

कर्नाटकमध्ये अशाच एका बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या बातमीचा विषय असा की, एका वृद्ध महिलेला आलेले लाईट बिल असा आहे. एका लहानशा घरात राहणाऱ्या या आजीबाईंना एका बल्बचे आलेले लाईटबिल होते तब्बल एक लाख रुपये. बिलाचा एवढा आकडा पाहिल्यावर त्यांना भोवळ यायची बाकी राहिली. त्यांनी त्याविरोधात आता संबंधित प्रशासनाकडे तक्रार अर्जही केला आहे.

सोशल मीडियावर त्या लाईटबिलाचा फोटो व्हायरल झाल्यानं त्याविषयी चर्चा सुरु झाली. विद्युत विभागाचा बेफिकीरणा यापूर्वी देखील वेगवेगळ्या गोष्टींमधून पुढे आल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये अव्वाच्या सव्वा बिल येणे, मीटर रिडिंगमध्ये गोंधळ होणे, कर्मचाऱ्यांचा अरेरावीपणा, बेशिस्तपणा, अनेकदा ग्राहकांना सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत.

light

झोपडीमध्ये राहणाऱ्या त्या आजीबाईंना जेव्हा लाईटबिल आले तेव्हा त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला. कारण बिलाचा आकडा होता एक लाख रुपये. त्या आजीबाईंचे वय ९० वर्षे होते. त्यांच्या त्या झोपडीमध्ये केवळ दोनच एलईडी बल्ब होते. त्याचे बिल एक लाख रुपये कसे आले असा प्रश्न त्या आजीबाईंना पडला होता. कर्नाटकमधील भाग्यनगर येथे राहणाऱ्या आजीबाईंना आलेल्या लाईटबिलानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे,

वीज बिल

गिरीजम्मा असे त्या आजीबाईचे नाव असून त्यांना दर महिना ७० ते ८० रुपये असे विजबील येते. मात्र यावेळी त्यांना जे बिल आले त्याचा आकडा १ लाख ०३ हजार ३१५ रुपये एवढे आहे. तो ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. भाग्य ज्योति योजनेतर्गत त्या आजीबाईंना विजेचे कनेक्शन मिळाले होते. या योजनेचा उद्देशच मुळी गरीब वस्तीमध्ये नागरिकांना कमी दरात वीज कनेक्शन देणे हा होता.

आता त्या लाईटबिलची गोष्ट समजल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आजीबाईंच्या घरी भेट दिल्यानंतर त्यांना त्या मीटरमध्ये बिघाड असल्याचे दिसून आले. त्यांनी ते कर्मचाऱ्यांना बदलण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच जो व्यक्ती मीटरचे रिडिंग घ्यायला आला होता त्यानं चुकीच्या पद्धतीनं रिडिंग घेतले आहे. असेही सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

Wani News : मार्कंडेय पर्वतावर पुन्हा ‘बंदी’चा डोंगर! चार वर्षांत धोकादायक शिड्या-पायवाटांची दुरुस्ती नाही, भाविकांचा संताप

SCROLL FOR NEXT