Mumbai Girl Video Viral Sakal
Trending News

Mumbai Girl Riding Video: पप्पांच्या पऱ्यांचा पराक्रम! एक गाडी, नो हेल्मट, चौघी जणी अन् सुसाट वेग

हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Girl Riding Video : एका गाडीवर चार तरूण मुली बसून प्रवास करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये स्कूटीचा वेग वाढवून विना हेल्मेट या तरूणी सुसाट वेगाने जाताना दिसत आहेत. तर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका स्कूटीवर चार तरूणी बसल्या असून त्या मुंबईतील वाशी येथील पाम बीच रोडवरून जात असल्याचं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सुसाट वेगाने चाललेल्या चार तरूणींपैकी एकीच्याही डोक्यावर हेल्मेट नसून मागच्या मुलीने गाडीचा हँडल पकडल्याचं यामध्ये दिसत आहे.

तर गाडी चालवत असताना या तरूणींचे सेल्फी आणि फोटो काढणं सुरू असून या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. "मजा करणे ही एक वेगळी गोष्ट आहे, पण हा प्रकार गंभीर आहे, तरूण पिढीला अजून जागृतीची गरज आहे. या तरूणींच्या गाडीवर जास्तीत जास्त दंड लादला गेला पाहिजे." असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

सदर घटना २५ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली असून त्यावर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर "हा तर पप्पांच्या पऱ्यांचा पराक्रम" अशा कमेंट काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

OBC Reservation : ओबीसी संघटना मोर्चावर ठाम, सरकारसोबत बैठकीत तोडगा नाही; श्वेतपत्रिकेचा आग्रह कायम

साप्ताहिक राशिभविष्य : (०५ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२५)

Anil Parab : कदमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार, अनिल परब यांचे प्रत्युत्तर; त्यांची ‘नार्को’ चाचणी करावी

SCROLL FOR NEXT