breakup sakal
Trending News

Viral: ब्रेकअप झालेल्यांसाठी खास ऑफर, बेवफा चायवाला देतोय डिस्कांउटमध्ये चहा

चहा टपरीच्या या बॅनरवर ब्रेकअप झालेल्यांसाठी खास ऑफर आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही थक्क करणाऱ्याही असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. बेवफा चहावाला टपरीचा हा फोटो आहे.

हा बेवफा चायवाला ब्रेकअप झालेल्यांना चहावर डिस्काउंट देतोय. असं त्याने त्याच्या टपरीच्या बॅनरवर ठळकपणे लिहलंय. सध्या या फोटोची सर्वत्र चर्चा सुरू आहे. (photo viral uttar pradesh moradabad a bewafa chaiwala give discount offer on tea to the people having breakup )

viral photo

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथील सोनकपूर हरथळा येथे एक चहाचा स्टॉल आहे. या चहाच्या टपरीचे नाव पाहून कोणालाही क्षणभर थांबवून हसावसं वाटेल. कारण या चहाचं नाव 'बेवफा चायवाला' असं आहे.

या टपरीच्या बॅनरवर सगळ्यांसाठी चहाची किंमत ठरलेली आहे मात्र या बॅनरवर ब्रेकअप झालेल्यांना खास ऑफर आहे. बाकीच्यांसाठी चहा हा १५ रुपये आहे तर ब्रेकअप झालेल्यांसाठी चहा हा फक्त १० रुपये आहे.

टपरीचा मालक अख्तर हा ४० वर्षाचा असून सुरवातीला ड्रायव्हर म्हणून काम करायचा. मात्र लॉकडाऊन काळात टॅक्सी चालवणे बंद झाले त्यामुळे त्यांनी चहाची टपरी सुरू केली आणि त्याला हटके नाव दिले.

सध्या त्याच्या चहाच्या टपरीवर असलेल्या खास ऑफरमुळे तो खूप फेमस आहे. सोशल मीडियावरही त्याच्या टपरीचे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Latest Maharashtra News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Marathi Bhasah Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Gold Rate Today: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा उसळी! महाराष्ट्रात 24 कॅरेट सोने 1 लाखाच्या पुढे, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांचा विद्यार्थ्यांशी अंतराळातून थेट संवाद, दिली 'ही' आश्चर्यकारक माहिती..

SCROLL FOR NEXT