dangerous weight loss trend: आजकाल सोशल मीडियाचा वापर कोण कशासाठी करेल काहीच सांगता येत नाही. यातूनच मग वेगवेगळ्या घटना घडताना आपण बघतो. अशीच एक खळबळजनक घटना तामिळनाडूत घडली आहे. कन्याकुमारी जिल्ह्यातील एका १७ वर्षीय मुलाचा सोशल मीडियामुळे जीव गेल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हा मुलगा त्याच्या घरात संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्याला गुदमरल्यासारखं होत होतं आणि श्वास घेण्यासही त्रास होत होता. सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडिओवरून तो त्याचे वजन कमी करण्यामागे लागला होता. मागील काही दिवसांपासून त्याने केवळ लिक्विड पदार्थ खाणं सुरू केलं होतं, शिवाय तो अतिप्रमाणात व्यायामही करत होता.
प्राप्त माहितीनुसार या मुलाचे नाव शक्तीस्वरण असल्याचं समोर आलं असून तो पूर्णपणे निरोग आणि सक्रीय मुलगा होता. परंतु काही दिवसांपासून त्याने युट्यूबर डाएट प्लॅनचा व्हिडिओ पाहिला आणि तोच ट्रेंड त्याने स्वीकारला. तो पूर्णपणे त्या व्हिडिओनुसार त्याचं डाएट ठेवत होता.
त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, हा डाएट फॉलो करताना त्याने कोणत्याही डॉक्टरांचाही सल्ला घेतलेला नव्हता. जेवण सोडून तो केवळ द्रव आहार घेत होता. यामुळेच त्याला कमजोरी आली असावी. एवढंच नाहीतर काही दिवसांआधी त्याने औषधी घेणंही सुरू केलं होतं. हे सगळं करताना तो व्यायाम करत होता परंतु त्याप्रमाणात योग्य आहार त्याने घेतला नाही.
तसेच गुरुवारी अचानक त्याला श्वास घेण्यास त्रास होवू लागला आणि कुटुंबीयांना काही कळण्याआधीच तो बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ डॉक्टरकडे नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. तो कॉलेजमध्ये जाण्याआधी त्याचं वजन कमी करू इच्छित होता, म्हणूनच तो अशाप्रकारे डाएट घेण्याच्या मागे लागला होता, ज्यामुळे त्याचे वजनही बरेच कमी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.