bus viral video 
Trending News

Viral Video: असला कसला जीवघेणा प्रवास! एका बाजूला झुकलेली बस, खिडकीला लटकलेले विद्यार्थी अन् अचानक...

School Student Falls From Over Crowded Bus: व्हिडिओमध्ये दिसतंय की बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसलेत. अनेक लोक लटकून प्रवास करत आहेत. काही विद्यार्थी देखील लटकून प्रवास करत आहे.

कार्तिक पुजारी

कांचीपुरम- तामिळनाडूच्या कांचीपुरममधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एक भरगच्च भरलेल्या बसमधून एक विद्यार्थी पडून जखमी झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसलेत. अनेक लोक लटकून प्रवास करत आहेत. काही विद्यार्थी देखील लटकून प्रवास करत आहे.

बस भरधाव पुढे जात असते. लोक लटकले असल्याने बस एका बाजूला झुकलेली देखील दिसते. अशावेळी बसला लटकलेला एक विद्यार्थी खाली पडतो. मिळालेल्या माहितीनुसार, तो जखमी झाला आहे. एकाने या घटनेचा प्रचंग कॅमेऱ्यात कैद केलाय. खरंतर अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ जुना आहे. तामिळनाडूमधील कांचीपूरम जिल्ह्यातील ही घटना आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, विद्यार्थ्याचा पाय निसटला अन् तो रस्त्यावर पडला. सुदैवाने त्याच्या अंगावरून बसचं चाक गेलं नाही. नाहीतर मोठा अनर्थ घडला असतात.

विशेष म्हणजे असा अपघात घडून सुद्धा बस ड्रायव्हर किंवा कंडक्टर बस थांबवण्याची तसदी घेत नाहीत. एक टू-व्हिलर चालक थांबून विद्यार्थ्याची मदत करतो. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त संस्खेने लोक प्रवास करत असल्याचं तमिळनाडूमध्ये अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सरकारकडे बसची संख्या वाढवण्याची मागणी अनेकदा होत असते. पण, याबाबत ठोस असा काही निर्णय झालेला नाही अशी लोकांची प्रतिक्रिया आहे.

ट्रॅफिक पोलिसांनी अशा प्रकाराची गंभीर दखल घ्यायला हवी. अशा पद्धतीने बस चालवणाऱ्या बस ड्रायव्हरवर कारवाई झाली पाहिजे अशी लोकांची भावना आहे. शिवाय, यासंदर्भात कठोर कायदा करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT