TikTok Star Santosh Munde_Beed 
Trending News

TikTok Star Santosh Munde Dies: बीडचा टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा वीजेचा शॉक लागून मृत्यू!

या दुर्घटनेसाठी धनजंय मुंडेंनी वीजवितरण कंपनीला धरलं जबाबदार

सकाळ डिजिटल टीम

बीड : रील्सद्वारे अस्सल ग्रामीण स्टाईलमध्ये लोकांचं मनोरंजन करणारा बीड जिल्ह्याचा टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला आहे. शेतातील विजेच्या ट्रान्सफॉर्मरचा फ्यूज जोडताना त्याच्यासह त्याच्या मित्रालाही विजेच्या तीव्र धक्क्यानं आपले प्राण गमवावे लागले. संतोषच्या मृत्यूवर परळीचे आमदार धनजंय मुंडे यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे. (TikTok Star of Beed Santosh Munde Dies due to shock of electricity)

संतोष मुंडे हा बीड जिल्ह्यातील भोगलवाडी (ता.धारूर) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा होता. शेतातच तो पूर्वी टिकटॉक अॅपवर अनेकदा व्हिडिओ बनवत असतं. आपल्या अस्सल ग्रामीण शैलीत लोकांना हसवण्याचं काम करता करता तो प्रसिद्धीच्या झोतात आला. टिकटॉक बंद झाल्यानंतर इन्स्टाग्रामवरील रिल्समधूनही तो नियमितपणे आपल्या फॉलोवर्सच्या भेटीला येत होता.

धनंजय मुंडेंनी महावितरणला धरलं जबाबदार

संतोष मुंडे या ग्रामीण भागातील हरहुन्नरी तरुणाच्या मृत्यूप्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांनी देखील शोक व्यक्त केला असून महावितरणच्या कारभारावरुन या कंपनीलाच जबाबदार धरलं आहे. त्यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांच्या पोरांना ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव आणि अपुऱ्या सुविधा यामुळं आपला जीव धोक्यात घालून स्वतः बरीच कामं करावी लागतात. या दुर्दैवी अपघाताची जबाबदारी महावितरणने घ्यावी, या अपघातात नेमकी कुणाची चूक आहे हे समोर आलं पाहिजे. संतोष व अपघाती मृत्यू झालेल्या अन्य तरुणाच्या कुटुंबास महावितरणने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.

हे ही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT