Khalistani
Khalistani Sakal
Trending News

Video Viral : तिरंगा रॅली काढणाऱ्या भारतीयांवर खलिस्तान्याकडून प्राणघातक हल्ला; ध्वजाची विटंबना

सकाळ डिजिटल टीम

मेलबर्न : ऑस्ट्रेलियामध्ये तिरंगा रॅली काढणाऱ्या भारतीय नागरिकांवर खलिस्तान्यांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी महिलांवरसुद्धा हल्ला केला असून भारतीय ध्वजाला फाडून टाकत अपमान केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

दरम्यान, खलिस्तानी भारतातील पंजाबमधील शीख समाजातील लोकांची एक संघटना आहे. शीख धर्मियांसाठी वेगळा देश असावा अशी त्यांची मागणी आहे. तर मागच्या अनेक दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्येही भारतीय नागरिकांना खलिस्तान्याकडून लक्ष्य केलं जात होतं. यासंबंधी अनेकदा भारतीयांनी ऑस्ट्रेलियातील पोलिसांना माहिती दिली पण पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याची माहिती आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, काही खलिस्तानी खलिस्तानचा ध्वज घेऊन भारतीय ध्वज घेतलेल्या नागरिकांना काठीने मारहाण करताना दिसत आहेत. तर काहीजणांकडून ध्वज फाडण्यात आला असून त्याला पायदळी तुडवण्यात येत आहे. या प्रकारानंतर स्थानिक पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली आहे.

याआधीही खलिस्तान्यांनी हिंदू मंदिरांची केली होती विटंबना

ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरांची तोडफोड झाल्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली आहे. मेलबर्नमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये खलिस्तान समर्थकांनी भारताविरोधी घोषणा देत तीन मंदिरांची विटंबना केली होती.

दरम्यान,भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, “मी ऑस्ट्रेलियातील खलिस्तानी समर्थकांच्या भारतविरोधी कारवायांचा तीव्र निषेध करतो. या कारवायांद्वारे देशाची शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली पाहिजे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT