तुळशीच्या रोपाचे फायदे
तुळशीच्या रोपाचे फायदे Esakal
Trending News

Tulsi Vastu Tips : तुळशीचं रोप देईल घरात आरोग्य आणि सौख्य

Kirti Wadkar

हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे. हिंदू धर्मात Hindu Religion तुळस म्हणजे लक्ष्मी मातेचं रुप आहे. तुळशीत लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं अशी आख्यायिका आहे. ज्या घरात तुळस सदाबहार फुललेली असते त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी असते असं मानलं जातं. Tulsi Plant in Home will give Happiness and Health Marathi Tips

वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसारही Vast Shastra घरात तुळशीचं रोप ठेवल्याने सुख-सृद्धी नांदते आणि आर्थिक संकटांपासून दूर राहता येतं. वास्तूनुसार, तुळशीचं Tulsi रोप पर्यावरण शुद्ध करण्यासाठी ,सकारात्मकता, ध्यान आणि संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी ओळखली जाते. म्हणून हिंदू धर्मात तुळस पवित्र रोप मानलं जातं.

कोणत्याही शुभ कार्यासाठी तसचं पुजाअर्चेसाठी Pooja तुळस महत्वाची असते. तसचं आयुर्वेदातही Ayurveda तुळशीचं मोठं महत्व आहे. तुळशीचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. एकंदर पवित्र असलेली तुळस तुमच्या घर, कुटुंब आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

ज्योतिष शास्त्रातही तुळशीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीचे काही उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होवू शकतात. तसचं तुमच्यावरील अनेक संकट दूर होवू शकतात. काय आहेत हे उपाय पाहुयात. 

१. इच्छा पूर्ततेसाठी- तुळशीची ११ पानं तोडून स्वच्छ धुवून ती उन्हामध्ये वाळवावी. त्यानंतर भगव्या रंगाच्या शेंदुरमध्ये किंवा भगव्या कुंकवात मोहरीचं तेल मिसळावं.  त्यानंतर वाळलेल्या तुळशीच्या पानांवर या कुंकवाने राम नाव लिहावं. 

या राम नाव लिहिल्या ११ पानांना एका धाग्यात ओवून त्याची माळ तयार करावी. त्यानंतर ही माळ हनुमानाला घालावी, या उपायामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवू शकतात.

हे देखिल वाचा-

२. जर तुमच्यावर एखादं आर्थिक संकट आलं असेल किंवा पैशांची समस्या असेल तर  एका लाल कापडात तुळशीची पानं बांधून तुम्ही तुमच्या पर्स किंवा तिजोरीत ठेवा. या उपायामुळे घरात पैशांची आवक वाढते आणि कुटुंबात समृद्धी वाढते.

३. जर तुमच्या घरात सतत भांडणं आणि केल्श वाढत असेल तर त्यासाठी तुळस उपयोगी ठरू शकते. यासाठी तुळशीची ४-५ पानं तोडून स्वच्छ धुवा.  ही पानं पाण्याने भरलेल्या एका पितळेच्या तांब्यात टाका. नियमितपणे आंघोळ आणि पूजा झाल्यानंतर तुळशीची पान टाकलेल्या तांब्यातील पाणी तुमच्या घरातील दरवाज्यावर तसचं इतर ठिकाणी शिंपडा.

जोतिष शास्त्रानुसार असं केल्याने कुटुंबातील क्लेश कमी होवून जवळीक वाढू लागेत आणि कुटुंबियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

४. जर तुम्हाला तुमचा भाग्योदय हवं असेल म्हणजे नशीबात चांगले बदल घडावे अशी इच्छा असेल तर एक पिठाचा दिवा तयार करा. या दिव्यामध्ये तूप आणि चिमूटभर हळद टाका. हा दिवा संध्याकाळच्या वेळी प्रज्वलित करून तुळस वृंदावनात किंवा तुळशीच्या मुळांपाशी उत्तर दिशेला ठेवा. यामुळे तुमचं नशीब चमकण्यास मदत होईल. 

५. एखाद्या कामामध्ये तुम्हाला यश हवे असेल किंवा तुम्ही एखादं शुभ काम करण्यासाठी जात आहात अशावेळी तुळशीचं पूजन करावं. यासाठी तुळशीची दोन पान हाता घेऊन हात जोडावे. त्यानंतर ११ वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र उच्चारावा. त्यानंतर शुद्द मनाने या तुळशीच्या दोन पानांचं सेवन करावं. यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल. 

६. दाम्पत्य सुखासाठीदेखील तुळशीच्या पानांचा उपाय ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आला आहे. पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतील आणि नात्यामध्य दुरावा निर्माण झाल्यास हा उपाय फायदेखील ठरतो. यासाठी पत्नीने शुक्ल पक्षातील कोणत्याही शुक्रवारी तुळशीच्या रोपाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावं. 

संध्याकाळी पत्नीने तुळशीच्या रोपाजवळ गायच्या तूपाचा दिवा लावावा. या उपायाने केवळ १५ दिवसांमध्येच पती पत्नीचं नातं पुन्हा फुलण्यास मदत होईल. 

हे देखिल वाचा-

तुळशीसाठी योग्य जागा

घरात किंवा अंगणात तुळशीचं रोप लावून त्याची नित्य नेमाने पूजा केल्यास घरात शांती आणि प्रसन्न वातावरण राहत. मात्र तुळशीचं रोप लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तुळस वृंदावन उभारताना किंवा तुळशीच्या रोपासाठी योग्य जागा निवडावी. घराच्या मागील अंगणात तुळस लावू नये. 

तुळशीचं रोप घराच्या दक्षिण-पूर्ण (अग्नेय कोन) किंवा उत्तर-पश्चिम (वायव्य कोन) या ठिकाणी लावणं अतिशुभ मानलं जातं. घराचं सांडपाणी जात असले अशा ठिकाणीही तुळस लावू नये. 

तुळस देते संकटांचे संकेत

ज्या घरावर संकट येणार असेल त्या घरातील तुळशीचं रोप वाळू लागतं. खूप काळजी घेतल्यानंतरही जर तुळशीचं रोप वारंवार वाळत असेल किंवा रोपाची पानं गळून ते निर्जीव होत असेल तर शकुन शास्त्रानुसार घरात एखाद्या मोठ्या संकटाची ती चाहूल समजली जाते.  अशावेळी कोणत्याही गोष्टी किंवा निर्णय काळजीपूर्व घ्यावे.

ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीचे हे काही फायदे आहेत. या शिवाय अंगणामध्ये तुळस लावणं हे आरोग्याच्या दृष्टीने देखिल महत्वाचं मानलं जातं. यासाठीच तुळशीला रोज सकाळी पाणी शिंपडून तिची पूजा करावी. 

टीप- हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. अंधश्रद्धा पसरवणे हा लेख प्रसिद्ध करण्यामागचा हेतू नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT