Viral News esakal
Trending News

Viral News : पोलिसाच्या बायको पोरांची नोटांच्या बंडलांसह सेल्फी अन् मग जे घडलं...

त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात आली असून या पोलीसाची चौकशी सुरू आहे

साक्षी राऊत

Viral News : सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात मात्र एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने काढलेली सेल्फी पोलीस अधिकाऱ्याला चांगलीच महागात पडली. उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील एक एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने आणि बायकोने नोटांच्या बंडलासह सेल्फी घेतला. हा सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात आली असून या पोलीसाची चौकशी सुरू आहे.

व्हायरल झालेल्या सेल्फीमध्ये पोलीस अधिकाऱ्याची बायको दोन मुलांसह 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलांसह सेल्फीमध्ये पोज देताना दिसले. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या या छायाचित्रात पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि दोन मुले 14 लाख रुपयांच्या रोख रकमेसह बेडवर बसलेले दिसत आहेत.

नोटांच्या बंडलांसह अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होताच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. स्टेशन प्रभारी रमेशचंद्र सहानी असे संशयित पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून यांची पोलीस लाईन्स येथे बदली करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या फोटोवर स्पष्टीकरण देत रमेशचंद्र सहानी यांनी स्वतःचा बचाव करत हा सेल्फी जेव्हा त्यांनी कौटुंबिक मालमत्ता विकली होती तेव्हाचा म्हणजेच 14 नोव्हेंबर 2021 रोजी घेतला होता, असे सांगितले. या प्रकरणावर पोलिसांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT