Viral News sakal
Trending News

Viral News : धक्कादायक! 15 वर्षाच्या मुलाच्या पोटातून निघाला चक्क मोबाईल चार्जर अन् हेअरपिन

एका 15 वर्षाच्या मुलाच्या पोटातून चक्क मोबाईल चार्जर अन् हेअरपिन निघाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. अश्याच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षाच्या मुलाच्या पोटातून चक्क मोबाईल चार्जर अन् हेअरपिन निघाले आहे.

सहसा लहान मुलांना तोंडात काहीही टाकायची सवय असते. त्यामुळे लहान मुलाच्या पोटातून अनेक गोष्टी निघाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असाव्यात पण 15 वर्षीय किशोरवयात असलेल्या मुलाच्या पोटातून मोबाईल चार्जर अन् हेअरपिन निघाल्याने सर्वांनाच धक्का बसलाय.

एका मुलाला तीव्र पोटदुखी आणि उलट्या होत असल्याने त्याला डॉक्टरकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे रिपोर्ट काढला आणि हा रिपोर्ट पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला. कारण एक्स-रे रिपोर्टमध्ये या मुलाच्या पोटात 3 फूट लांब मोबाईल चार्जर केबल आणि केसांची क्लिप दिसून आली.

त्वरीत या मुलावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि चार्जर केबल आणि हेअर क्लिप काढण्यात आली. या संबंधीत फोटो सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

शस्रक्रियेनंतर त्याच्या पोटातून या सर्व वस्तू जरी काढण्यात आल्या तरी या वस्तू पोटात कशा गेल्या, हे कुणालाच कळले नाही. 15 वर्षाचा मुलगा चुकूनही केबल खाणार नाही, त्यामुळे या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सोशल मीडियावर या प्रकरणावरुन अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेकांनी या मुलांचं मानसिक आरोग्य व्यवस्थित आहे का, अशी चौकशीसुद्धा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT