Viral Video Air India No AC, No Crew Response Dubai To Jaipur Flight esakal
Trending News

Viral Video : ना एसी, ना क्रूचा प्रतिसाद! 5 तास विमानात AC शिवाय अडकले प्रवासी; एअर इंडियाच्या हलगर्जीपणाचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल

Viral Video Air India No AC, No Crew Response Dubai To Jaipur Flight : एअर इंडियाच्या विमानात एसी बंद आणि क्रूचा प्रतिसाद न मिळाल्याने प्रवासी पाच तास अडकून अस्वस्थ झाले. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे

Saisimran Ghashi

Viral Video : देशातील आघाडीच्या विमान सेवा पुरवणाऱ्या एअर इंडियावर पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुविधांबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नुकत्याच एका व्हिडिओमुळे एअर इंडियाच्या सेवा दर्जाबद्दल संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओत एका महिला प्रवाशाने फ्लाइटमध्ये पाच तास एसी (AC) न चालल्याची आणि क्रू मेंबर्सकडून कोणतीही मदत न मिळाल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. ही घटना एअर इंडियाच्या IX196 या फ्लाइटमध्ये घडली असून, अनेक प्रवाशांनी या परिस्थितीचा सामना केला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत संबंधित महिला तिच्या तीन वर्षांच्या मुलासह विमानात अडकलेली दिसते. तिने सांगितले की, मुलगा घामाने पूर्णपणे भिजलेला आहे आणि संपूर्ण विमानात उष्णतेमुळे असह्य स्थिती निर्माण झाली होती. एसी बंद असल्याने प्रवाशांना त्रास होत असून, अनेकांनी क्रू बटण दाबून १०० हून अधिक वेळा मदतीचा प्रयत्न केला. मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. क्रू मेंबर्सने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप त्या महिलेने केला.

"ना एसी, ना माहिती, ना क्रूचा प्रतिसाद!"

महिलेने स्पष्टपणे सांगितले की, "फ्लाइट ७ वाजता होती. आता १२ वाजले आहेत. आम्ही इतक्या वेळ बसलो आहोत. एसी चालू नाही. क्रूला किती वेळा बोलावलं तरी कोणी येत नाही. आमच्या मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना घाम फुटतोय, अस्वस्थ वाटतंय. काय चाललंय ते काहीच समजत नाही." या ७० सेकंदांच्या व्हिडिओत इतर प्रवासी देखील आपापली व्यथा मांडताना दिसतात. सर्व प्रवासी चिंतेत असून, परिस्थिती अंगावर येणारी आहे.

सोशल मीडियावर संतापाचा विस्फोट

@dietnaree या इन्स्टाग्राम वापरकर्त्याने ही रील पोस्ट करत या भयानक अनुभवाची माहिती दिली. त्याने म्हटले की, “आम्ही एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक IX196 मध्ये पाच तास अडकून होतो. एसी चालू नव्हता. क्रूकडून कोणतीही मदत नव्हती. प्रवासी घामाने चिंब झाले होते. या प्रकारामुळे विमान प्रवासाची भीती वाटते आहे. ही केवळ असुविधा नाही, तर प्रवाशांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणारी चूक आहे.”

या पोस्टला आत्तापर्यंत ३ कोटी १८ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ११ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये वापरकर्त्यांनी Air India वर ताशेरे ओढले आहेत. एका युजरने लिहिले, "ही प्रवाशांसोबतची पूर्णतः बेफिकिरी आहे." तर दुसऱ्याने म्हटले, "Air India ची सेवा दिवसेंदिवस अधिकच ढासळत चालली आहे." तर एक जण म्हणाला, एयर इंडिया बॉयकॉट करा

Air India च्या व्यवस्थापनाकडून अद्याप स्पष्टीकरण नाही

या प्रकरणानंतरही एअर इंडियाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. प्रवाशांचे म्हणणे आहे की, विमान कंपनीने त्वरित जबाबदारी स्वीकारून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी ठोस पावले उचलावीत. एअर इंडियासारख्या प्रतिष्ठित विमान कंपनीकडून अशी उदासीनता म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेची थट्टा असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

या घटनेने एअर इंडियाच्या सेवा दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटींवर कंपनी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT