Viral
Viral  esakal
Trending News

Viral : एवढंच बाकी होतं! भावानं डोश्यावर घातलंय गुलाबजाम अन् आईस्क्रीम, लोकांनी केलं ट्रोल

Pooja Karande-Kadam

Viral Video : सध्या नव्या बिझनेसच्या स्टार्टअप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सगळयात भारी आपलाच बिझनेस कसा होईल,यासाठी वाट्टेल ते करणारे तरूण आहेत. मध्यंतरी गोव्यातील एका चहावाल्याचा दारूवाला चहा फेमस झाला होता. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ म्हणून डोसा देशभरात प्रसिद्ध आहे. आजकाल डोशाचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. अनेकदा डोशावर केलेले प्रयोग खूप लोकप्रिय होतात. साधा प्लेन डोसा सोडून अनेकवेळा ते बनवण्यासाठी अवलंबलेले चित्रविचित्र कॉम्बिनेशन ही चर्चेत येते. (Viral Video : recipe gulab jamun dosa with ice cream bizarre combination viral video on social media see it)

नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात गुलाब जामुन आणि आईस्क्रीमचा डोसा तयार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी कोल्ड कॉफी मॅगी, गुलाब जामुन पराठा देखील चांगलाच व्हायरल झाला होता. आता या एपिसोडमध्ये गुलाब जामुन आईस्क्रीम डोश्याचंही नावं जोडलं गेलं आहे.

आईस्क्रीमपासून बनवलेला डोसा

गुलाब जामुन हा व्हिडिओ ट्विटर हँडल 'Mashable India’ या नावाने सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये विक्रेता बनवलेल्या डोसावर गुलाब जामुन ठेवतो आणि मग गुलाब जामुन मॅश करून सर्व डोश्यांवर चांगला पसरवतो.

यानंतर डोशावर ड्रायफ्रूट्स घातले आहेत. शेंगदाणे विखुरले जातात आणि मग शेवटी डोशाच्या मधोमध आईस्क्रीम ठेवून त्यावर गुलाबबेरी ठेवल्या जातात.(Dosa Recipes)

युजर्सनी केलं ट्रोल

गुलाब जामुनसोबत केलेला हा प्रयोग कोणालाही आवडलेल्या नाहीय.या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केलाय. अरेरे हेच पहायचं राहीलं होतं, हा व्हिडिओ पाहूनच ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी मंगळावर जमिन घेण्याची घाई केली असेल अशा खोचक प्रतिक्रिया युजर्सनी व्यक्त केल्या आहेत. तर, काहींनी हा केवळ प्रसिद्धीचा एक स्टंट असल्याचं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT