Viral video Wife beats husband : उत्तर भारतात सोमवारी २६ मे रोजी वट सावित्रीचे व्रत उत्साहात साजरे झाले. दरम्यान उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी उपवास करत असताना, इथे एका पत्नीने आपल्याच पतीला रस्त्याच्या मधोमध बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मारहाणीत पत्नीच्या बहिणीही मागे नव्हत्या, त्यांनीही मेहुण्यावर हात उचलल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हमीरपूर जिल्ह्यातील मौधा शहरातील रामनगर परिसरात घडलेल्या या घटनेचा २८ सेकंदांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. हा व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
या घटनेमागे पतीची दारू पिण्याची सवय असल्याचे सांगितले जात आहे. पत्नी आपल्या पतीच्या व्यसनाने इतकी त्रस्त होती की, वट सावित्रीच्या पवित्र दिवशीच तिचा संयम सुटला. व्हिडिओमध्ये, पत्नी आपल्या दोन बहिणींच्या मदतीने पतीचे केस पकडून त्याला रस्त्यावर ओढताना दिसत आहे. त्यानंतर ती त्याला चप्पलने मारहाण करते. आश्चर्याची बाब म्हणजे, यावेळी रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, पण कोणीही हस्तक्षेप करत नाही. मारहाण करणाऱ्या महिलांनी व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांना कडक शब्दात व्हिडिओ बनवू नका, अशी ताकीद दिल्याचेही ऐकू येत आहे.
या घटनेमुळे पती पत्नीच्या नात्यातील ताण आणि व्यसनाधीनतेमुळे ही घटना घडली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पत्नी आपल्या पतीच्या डोक्यावर चप्पल मारताना दिसत आहे. वट सावित्रीसारख्या शुभ दिवशी घडलेल्या या घटनेमुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया मिळत असून, लोक त्यावर मजेदार कमेंट्सही करत आहेत.