Virgin Birth in Crocodile esakal
Trending News

Virgin Birth in Crocodile : व्हर्जिन बर्थ म्हणजे काय?  जोडीदाराशिवाय मगरीची मादी गर्भवती राहते?

व्हर्जिन बर्थचा मगरीशी काय संबंध?

सकाळ डिजिटल टीम

Virgin Birth in Crocodile : मुलाला जन्म देण्यासाठी जोडप्याची गरज असते, परंतु काही सरपटणाऱ्या मादी असतात ज्या विना संभोग फलित अंडी किंवा बाळांना जन्म देऊ शकतात. आतापर्यंत आपण मासे , साप, सरडे या सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये हा गुण ऐकत आलोय पण आता एक नवं कोडं शास्त्रज्ञांसमोर उभं राहिलंय.

डॅरल कोस्टा रिकामध्ये एका मादी मगरीने फलित अंडी घातली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही मादी मगर गेल्या 16 वर्षांपासून ज्या बाजुला राहत होती त्या परिसरात एकही नर मगर नव्हता. शास्त्रज्ञांनी या अंड्यांवर संशोधन केलं असून मादी मगरीचा नर मगरीशी कधीही संपर्क झाला नसल्याचं समोर आलंय. या प्रजातीपासून व्हर्जिन जन्माची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जाते.

व्हर्जिन जन्म म्हणजे काय ?

व्हर्जिन जन्म ही एक सामान्य प्रक्रिया आहे. विज्ञानात त्याला पार्थेनोजेनेसिस म्हणतात. हे पार्थेनोस आणि जेनेसिस या दोन ग्रीक शब्दांपासून बनलेले आहे. हिंदीमध्ये याचा अर्थ 'लैंगिक पुनरुत्पादनाशिवाय नवीन जीवनाची उत्पत्ती करणे' म्हणजेच जोडीदाराशी लैंगिक संबंध न ठेवता मुलाला जन्म देणे. आतापर्यंत, मुंगी, साप, सरडा, मासे आणि मधमाश्याच्या काही प्रजातींमध्ये व्हर्जिन जन्माची उदाहरणे सापडतात. त्यामध्ये सेक्स क्रोमोसोम नसतात. ते केवळ पार्थेनोजेनेसिसद्वारे पुनरुत्पादन करतात.

व्हर्जिन जन्म का चर्चेत आहे

कोस्टा रिकामध्ये एका मादी मगरीने फलित अंडी घातली तेव्हापासून व्हर्जिनचा जन्म चर्चेत आहे. वास्तविक ही मगर प्राणिसंग्रहालयाच्या एका बंदोबस्तात आहे. एका रिपोर्टनुसार, या मादी मगरीने 14 अंडी घातली होती आणि त्यांची काळजी घेण्यासाठी ती पाण्याबाहेर जात होती. प्राणीसंग्रहालयाच्या रक्षकाने याची माहिती दिली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला, कारण ही मादी मगरी गेल्या 16 वर्षांपासून कोणत्याही नर मगरीच्या संपर्कात आली नव्हती. यानंतर असे खरोखरच घडले आहे का, हे जाणून घेण्यासाठी संशोधन सुरू झाले.

गर्भ हा मादी मगरीसारखा होता

व्हर्जिन मादी मगरीच्या अंड्यांवर संशोधन केले असता एका अंड्यामध्ये विकसित भ्रूण आढळून आले. संशोधन पथकाचे नेतृत्व वॉरेन बूथ, व्हर्जिनिया टेकमधील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ

आहेत शिवाय पार्थेनोजेनेसिसमध्ये तज्ञही आहेत. त्यांच्या मते हा गर्भ पूर्णपणे मादी मगरीसारखा होता. हे संशोधन बायोलॉजी लेटरमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या लेखात मादी मगरीने व्हर्जिन जन्म देणे हे डायनासोरशी जोडले गेले आहे, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की डायनासोर देखील व्हर्जिन जन्म देण्यास सक्षम असावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT