Samastipur Nag Panchami live snake procession viral video esakal
Trending News

Snake Video : गळ्यात साप, दातात साप! लाखों ‘जिवंत’ नाग घेऊन निघाली अनोखी नागपंचमी यात्रा; व्हिडीओ तुफान व्हायरल

Nag Panchami live snake procession viral video : बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात नागपंचमीच्या दिवशी जिवंत सापांसह काढलेली अनोखी यात्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शेकडो भाविकांनी गळ्यात, हातात किंवा डोक्यावर साप घेऊन ही भव्य मिरवणूक पार पाडली

Saisimran Ghashi

थोडक्यात..

  • समस्तीपूरमध्ये नागपंचमी निमित्त हजारोंच्या उपस्थितीत सापांसह भव्य यात्रा पार पडली.

  • या अनोख्या परंपरेत लोक साप गळ्यात, हातात किंवा डोक्यावर घेऊन सहभागी होतात.

  • ही सुमारे १०० वर्षांची परंपरा स्थानिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवते.

Snake Nagpanchami Video : साप म्हटलं की बहुतांश लोकांची भीतीने गाळण उडते. पण बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात एक अशी परंपरा आहे जिथं साप हा भीतीचा नाही, तर श्रद्धेचा विषय मानला जातो. नागपंचमीच्या निमित्ताने सिंघिया घाटावर दरवर्षी होणारी ‘नाग यात्रा’ याच अनोख्या श्रद्धेचं प्रतीक ठरते. यंदाही ही यात्रा दणक्यात पार पडली असून, त्याचे थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

या यात्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे भाविक प्रत्यक्ष जिवंत साप घेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. कोणी गळ्यात साप गुंडाळलेला तर कोणी हातात, कोणी डोक्यावर तर काही जण काठीवर साप ठेवून मिरवत असल्याचे दृश्य यात दिसत आहे. या धार्मिक सोहळ्यात लहानांपासून वृद्धांपर्यंत शेकडो लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कोणाच्याही चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता, उलट त्यांच्या चेहऱ्यावर होती श्रद्धा, उत्साह आणि एक वेगळंच भक्तिभावाचं तेज.

या यात्रेची सुरुवात सिंघिया बाजारातील मा भगवती मंदिरात विधीवत प्रार्थना करून झाली. त्यानंतर भाविक बुधी गंडक नदीकडे प्रस्थान करत मिरवणूक काढली. या दरम्यान अनेकांनी सर्प देवी माता ‘विशहारी’च्या जयघोषात सापांना आपल्या गळ्यात किंवा हातात धरून निःभीतपणे चाल केला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असून, काहीजण तोंडात साप धरून दाखवत असलेली दृश्येही चर्चेचा विषय ठरली आहेत. यात्रेनंतर सर्व सापांना जंगलात परत सोडले जाते. त्यामुळे या श्रद्धेचा पर्यावरणपूरक पैलू देखील अधोरेखित होतो.

सिंघिया घाटावरील ही परंपरा तब्बल शंभर वर्षांहून अधिक जुनी असल्याचे स्थानिक सांगतात. खगडिया, सहारसा, बेगुसराय आणि मुजफ्फरपूरसारख्या मितिला प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून हजारो भाविक या यात्रेसाठी समस्तीपूरमध्ये एकत्र येतात.

महिलांसाठीही यामध्ये एक खास धार्मिक विधी असतो गहवर पूजा. यात त्या नागदेवतेकडे आपल्या कुटुंबाच्या आरोग्य, समृद्धी आणि संरक्षणासाठी प्रार्थना करतात. ज्या महिला मागील वर्षीची मनोकामना पूर्ण झाली असल्याचा अनुभव घेतात, त्या या यात्रेत खास प्रसाद अर्पण करून देवतेचे आभार मानतात. पण ही परंपरा वन्यजीवांना हानी पोहचवणारी आहे, अशाही प्रतिक्रिया येत आहे

FAQs

  1. समस्तीपूरमधील नागपंचमी यात्रा किती वर्षांपासून सुरू आहे?
    How old is the Nag Panchami procession in Samastipur?
    ➤ ही यात्रा सुमारे १०० वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे आणि ती स्थानिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

  2. या यात्रेत भाविक साप कसे हाताळतात?
    How do devotees carry snakes during the procession?
    ➤ भाविक साप गळ्यात गुंडाळून, हातात धरून किंवा काठीवर ठेवून अगदी सहजतेने मिरवणुकीत सहभागी होतात.

  3. विशहारी माता कोण आहे आणि तिचे महत्त्व काय आहे?
    Who is Goddess Vishahari and what is her significance?
    ➤ विशहारी माता ही स्थानिक सर्प देवी मानली जाते. तिच्या पूजेनं सर्पदंशापासून संरक्षण मिळतो, अशी श्रद्धा आहे.

  4. गहवर पूजा म्हणजे काय आणि ती कोण करतात?
    What is 'Gahvar Pooja' and who performs it?
    ➤ गहवर पूजा ही स्त्रिया घरच्या सुख, समृद्धी व सर्पदंशापासून संरक्षणासाठी करतात. त्यानंतर त्या विशेष प्रसाद अर्पण करतात.

  5. या सापांचं मिरवणुकीनंतर काय होतं?
    What happens to the snakes after the procession?
    ➤ मिरवणुकीनंतर सर्व सापांना त्यांच्या मूळ नैसर्गिक ठिकाणी म्हणजे जंगलात सुरक्षितरित्या सोडण्यात येतं.

Legislature Clash: नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला पोलीस कोठडी; पण किती दिवसांची? विधिमंडळातील प्रवेशाबाबतही मोठा निर्णय

Vidhan Bhavan Clash: महाराष्ट्राचा युपी बिहार झाला का? विधान भवनातील राडा प्रकरणी मनसेचे नेत्याचा सवाल

Latest Marathi News Updates : कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली मराठीत सांगावं लागेल- राज ठाकरे

Hijack Code Used by Pilots: विमान 'हायजॅक' झाल्याचं पायलट ‘ATC’ला नेमकं कोणत्या कोडद्वारे कळवतो?

Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॉकपिटमध्ये व्हिडीओ कॅमेरे का नसतात? पायलट लोकांचा असतो विरोध

SCROLL FOR NEXT