Video Two workers killed in bike trailer crash Pune esakal
Trending News

Accident Video : चाकण-तळेगाव मार्गावर भीषण अपघात; कामगाराच्या शरीराचा अक्षरक्ष: चंदामेंदा झाला, भयानक व्हिडिओ व्हायरल..

Video Two workers killed in bike trailer crash Pune : चाकण-तळेगाव मार्गावर ट्रेलरच्या धडकेत एचआर एक्झिक्युटिव्हचा जागीच मृत्यू झाला. खड्ड्यांमुळे वाढणाऱ्या अपघाताबाबत कामगारांमध्ये संतापाची लाट आहे

सकाळ वृत्तसेवा

थोडक्यात..

  • चाकण-तळेगाव मार्गावर ट्रेलरच्या धडकेत कामगाराचा मृत्यू झाला.

  • दुचाकी चालक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

  • रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

हरिदास कड, चाकण

Pune Accident Video : चाकण तळेगाव मार्गावर खालुंब्रे ता. खेड गावच्या हद्दीत आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कंपनीत कामासाठी निघालेल्या दुचाकीवरील कामगाराचा ट्रेलरच्या धडकेत चाकाखाली गेल्याने जागीच मृत्यू झाला. गजानन बाबुराव बोलकेकर (वय- २७ वर्ष, रा. येलवाडी ,ता. खेड ,जि. पुणे) असे अपघातात मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याच्या शरीराचा अक्षरक्ष: चंदामेंदा झाला होता.

दुचाकी चालक जखमी असून त्याच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली.

चाकण औद्योगिक वसाहतीतील ऑटोकॉम कार्पोरेशन पानसे प्रा. लिमिटेड या कंपनीत बोलकेकर कामास होता. तळेगाव बाजूकडून तो चाकण बाजूकडे येत होता.दुचाकीच्या पाठीमागे तो बसलेला होता. ट्रेलर तळेगाव बाजूकडून चाकण बाजूकडे चालला होता. बोलकेकर हे एचआरएक्झिक्युटिव्ह म्हणून कंपनीत काम करत होते. ते सध्या येलवाडी ता. खेड येथे राहत होते.१८ एप्रिल ला त्यांचा विवाह झाला होता. ते मुळचे बोळका, जि. नांदेड येथील आहे. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. कंपनीचे व्यवस्थापक सुरेश नायर व इतर कामगारांनी या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.

याबाबत कंपनीचे व्यवस्थापक सुरेश नायर यांनी सांगितले की ,"चाकण- तळेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत .अनेक कामगारांचे जीव जात आहेत ,पण याकडे शासन कोणीच लक्ष देत नाही. एक कामगार गेल्याने त्याचे सगळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे याकडे शासनाने आता तरी डोळे उघडून पाहावे.

FAQs

  1. अपघात कधी आणि कुठे झाला?
    आज सकाळी साडेसहाच्या सुमारास चाकण-तळेगाव मार्गावर अपघात झाला.

  2. मृत व्यक्ती कोण होती?
    गजानन बाबुराव बोलकेकर हे कंपनीतील एचआर एक्झिक्युटिव्ह होते.

  3. अपघाताचे मुख्य कारण काय आहे?
    ट्रेलरच्या धडकेत दुचाकीवर बसलेला कामगार चाकाखाली आल्यामुळे अपघात झाला.

  4. जखमी कामगाराचा आरोग्यस्थिती कशी आहे?
    दुचाकी चालक जखमी असून चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

  5. पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
    ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction: अखेर संभ्रम संपला! यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट उत्तर दिलं, महत्त्वाची माहिती समोर

ATM Firing Incident :'एटीएम'बाहेरच तरूण व्यावसायिकावर गोळीबार; सहा लाखांची रोकड अन् दुचाकीही पळवली

Indian Railway: महाराष्ट्रातील रेल्वेसाठी २३,९२६ कोटींचा निधी, अमृत भारत स्थानकांना गती

Chhagan Bhujbal: ''26 तारखेला मी आणि दादा देवगिरीवर होतो, ते म्हणालेले...'' राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन छगन भुजबळ यांचं मोठं विधान

Latest Marathi News Live Update: रेल्वेच्या ईस्ट आणि वेस्ट कनेक्टिव्हिटी स्पेशल कॉरिडॉर अंतर्गत कनेक्ट केलं जाणार

SCROLL FOR NEXT