Odisha couple punished for same gotra marriage viral video esakal
Trending News

Video : प्रेम केलं म्हणून अमानुष शिक्षा! बैलांप्रमाणे नांगराला जुंपलं अन् चाबुकाने फटके मारून कपडे...; काळीज पिळवटणारा व्हिडिओ व्हायरल

Odisha couple punished for same gotra marriage viral video : ओडिशातील रायगड जिल्ह्यात एकाच गोत्रात प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून प्रेमी युगुलावर अमानुष अत्याचार करण्यात आले. बैलांसारखे शेतात नांगराला जुंपून, फटके मारून गावाबाहेर हाकलण्यात आले.

Saisimran Ghashi

थोडक्यात..

  • ओडिशातील कंजमाजोडी गावात प्रेमी युगुलावर एकाच गोत्रातील विवाह केल्याने अमानुष शिक्षा झाली.

  • शेतात बैलांप्रमाणे नांगराला जुंपून त्यांना मारहाण करण्यात आली आणि गावाबाहेर हाकलण्यात आले.

  • घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अद्याप कोणत्याही आरोपीवर ठोस कारवाई झालेली नाही.

Viral Video : प्रेम म्हणजे माणसाला जोडणारी भावना, पण ओडिशात घडलेली घटना ही प्रेमाच्या नावावर दिली गेलेली अमानुष शिक्षा पाहून कोणाचंही काळीज हादरेल. प्रेमात पडल्यामुळे एका तरुण आणि तरुणीला केवळ एकाच गोत्रात विवाह केल्याच्या कारणावरून गावकऱ्यांनी जी शिक्षा दिली, ती पाहून संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारा प्रश्न उभा राहीला आहे

रायगड जिल्ह्यातील आदिवासी बहुल कंजमाजोडी या गावात ही संतापजनक घटना घडली आहे. गावातील लक सारका आणि कोडिया सारका हे प्रेमी युगुल एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र स्थानिक रीतिरिवाजांनुसार त्यांचे नाते मावशी आणि भाचा असे मानले जाते आणि त्यामुळे त्यांच्यातील संबंध गावकऱ्यांनी पवित्र गोत्रभंग मानला.

गावात तातडीने एक कंगारू न्यायालय भरवण्यात आलं. या न्यायालयात कुठलाही कायदेशीर आधार नसताना दोघांवर अत्यंत अपमानास्पद शिक्षा लादण्यात आली. बैलांच्या जागी या दोघांना नांगराला जुंपण्यात आलं, त्यांना शेतात फिरवण्यात आलं आणि गावकऱ्यांनी त्यांच्यावर फटके मारले. ग्रामदेवतेसमोर विधी करून या शुद्धीकरणाचं नाट्य घडलं. संपूर्ण शिक्षेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, त्यात हे सगळं उघडपणे घडताना दिसतं.

ही शिक्षा इतकी अमानवी होती की, तिचा शेवटही तितकाच क्रूर ठरला गावकऱ्यांनी या दोघांना गावाबाहेर हाकलून लावलं. सध्या हे प्रेमी युगुल कुठे आहे याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितलं, “आमच्याच परंपरेनुसार, एकाच गोत्रात लग्न करणं म्हणजे रक्तसंबंधात लग्न करणं, जे आमच्यासाठी निषिद्ध आहे.” परंतु या परंपरेच्या नावाखाली माणुसकीची जी थट्टा झाली, ती माफ करण्याजोगी आहे का?

आणखी धक्कादायक बाब म्हणजे ही घटना जरी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असली तरी आजपर्यंत या प्रकरणी कोणावरही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक स्वाती एस. कुमार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं, “ही घटना अतिशय गंभीर आहे. चौकशीसाठी पथक पाठवण्यात येणार आहे व योग्य ती कारवाई केली जाईल.”

या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजातील कट्टर रूढी, परंपरांच्या नावाखाली माणसावर लादल्या जाणाऱ्या शिक्षा आणि प्रेमाचं मूल्य काय आहे, यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. प्रेमाला जर अशी शिक्षा दिली जात असेल, तर ही मानवतेची हार नाही का?

हा प्रकार केवळ एक प्रेमप्रकरण नसून, समाजातील मानसिकतेचं, क्रूरतेचं आणि स्त्री-पुरुष स्वातंत्र्याच्या विरोधात उभ्या असलेल्या व्यवस्थेचं आरसाच आहे. आता वेळ आली आहे की, अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी समाजाने आणि व्यवस्थेने जागं व्हायला हवं.

FAQs

  1. ही घटना कुठे घडली?
    ही घटना ओडिशा राज्यातील रायगड जिल्ह्यातील कंजमाजोडी गावात घडली आहे.

  2. प्रेमी युगुलावर शिक्षा का करण्यात आली?
    ते एकाच गोत्रात असूनही विवाहबंधनात अडकले, जे आदिवासी परंपरेनुसार निषिद्ध मानलं जातं.

  3. शिक्षेच्या स्वरूपात नेमकं काय केलं गेलं?
    त्यांना बैलांप्रमाणे शेतात नांगराला जुंपून मारहाण करण्यात आली आणि गावाबाहेर हाकलण्यात आलं.

  4. पोलीस किंवा प्रशासनाने यावर काय कारवाई केली?
    पोलीस अधीक्षकांनी चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले असून कारवाई प्रक्रियेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

Chhatrapati Sambhajinagar News : विवाहाचे अमिष दाखवून संबंध! डिएनए अहवालातून स्पष्ट झालेल्या पित्याला जामिन

गावाकडे जात असताना प्रसिद्ध गायकावर अंदाधुंद गोळीबार; पाठलाग करत कारमधून हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या, घटनेनंतर खळबळ

MP Supriya Sule : जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा फक्त माध्यमातच

SCROLL FOR NEXT