Woman Midnight Auto Kidnaping Video esakal
Trending News

Video : मध्यरात्री तरुणीसोबत अमानुष कृत्य! थरकाप उडवणारी घटना व्हायरल; मुलींनो, एकट्या रिक्षातून प्रवास करण्याआधी नक्की पाहा हा व्हिडीओ..

Woman kidnapping Video : मध्यरात्री एका तरुणीचं भररस्त्यात अपहरण करतानाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिलांनी रात्री प्रवास करताना विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Saisimran Ghashi

Viral Video : एका तरुणीबरोबर मध्यरात्री घडलेल्या अमानुष घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून प्रत्येकाच्या मनात धडकी भरते तर मुलींना मात्र खास काळजी घेण्याचा इशारा मिळतोय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दिसून येते की, मध्यरात्री एक तरुणी रस्त्याच्या कडेला उभी असते. तसतसे एक रिक्षा तिच्या जवळ येते आणि थांबते. तिने रिक्षा पाहून थोडा वेळ रिक्षात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक रिक्षातून एक व्यक्ती उतरतो आणि जबरदस्तीने तिच्या हातात रिक्षेत बसण्याचा प्रयत्न करतो. भीतीने घाबरलेली तरुणी विरोध करण्याचा प्रयत्न करत असतानाही त्या व्यक्तीने तिला रिक्षात घालून बाहेर घेऊन जाण्यास सुरुवात केली.

ही घटना अगदी काही मिनिटांतच घडते. रिक्षाचालक धडपड करत रिक्षा सुरू करतो आणि त्या तरुणीला घेऊन पुढे जातो. या घटनेचे ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आणि प्रतिक्रिया

हा व्हिडीओ Instagram वर @skymediaa_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून,त्याला आतापर्यंत तब्बल ३.९ मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “तुम्ही जिथे जाल तिथे काळजी घ्या, कारण सध्या सगळीकडे प्राणी आहेत.” ही कमेन्ट समाजातील वाढत्या अपराध आणि महिलांच्या असुरक्षिततेकडे लक्ष वेधते.

सोशल मीडियावर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, “आता तुम्ही हेही म्हणू शकत नाही की, तिने काय घातले होते?”, तर दुसऱ्याने भावनिकपणे व्यक्त केले, “तिच्याबरोबर काय झालं असेल, याचा मी विचारही नाही करू शकत.” अनेकांनी या घटनेला ‘भयानक’ आणि ‘हृदयद्रावक’ म्हणत, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे आवाहन केले.

महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न

गेल्या काही वर्षांत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढल्या असून यामुळे महिलांचा रात्रीचा प्रवास धोकादायक झालेला आहे. अनेकदा महिलांना सार्वजनिक ठिकाणी छेडछाड, शारीरिक अत्याचार सहन करावे लागतात. या घटनेने पुन्हा एकदा ठळक केले आहे की, देशातील महिला अजूनही सुरक्षित नाहीत आणि समाजाने महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

या घटनेतून मुलींनी हे समजून घेणे गरजेचे आहे की रात्री एकट्या प्रवास करताना सर्वतोपरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणतीही परिस्थिती असो, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी शक्यतो रिक्षा किंवा वाहन आधी तपासणे, कुणी असुरक्षित वाटल्यास तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा जवळच्या लोकांशी संपर्क करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT