आईच्या डोळ्यांसमोरच तिच्या तीन वर्षांच्या बाळाचा भीषण अपघात झाला.
रस्त्यावर धावत गेलेल्या बाळाला भरधाव कारने उडवलं.
सोशल मीडियावर हा हृदयद्रावक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
Viral Video : आई आणि बाळाचं नातं म्हणजे अतूट असा प्रेमबंधनाचा धागा. आपल्या बाळाच्या सुरक्षेसाठी आई सर्वस्व पणाला लावते. मात्र काही क्षणांची गफलत कधीकधी आयुष्यभराची जखम बनते. सध्या सोशल मीडियावर असाच काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे, ज्यात एका आईसमोर तिच्या केवळ तीन वर्षांच्या बाळाला भररस्त्यात कार उडवून जाते.
हा संपूर्ण प्रकार इतका झपाट्याने घडतो की पाहणाऱ्याचं काळीज अक्षरशः थरथरतं. व्हिडीओमध्ये दिसतं की एक आई आपल्या छोट्या मुलाला घेऊन कारजवळ येते. तिच्या हातात बॅग असते, त्यामुळे ती बाळाचा हात धरत नाही. ती कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतानाच छोटं बाळ अचानक रस्त्यावर धावतं. आई क्षणात त्याच्यामागे धाव घेते, पण त्याच क्षणी भरधाव वेगाने येणारी एक कार त्या बाळावरून सरळ धावते. काही कळायच्या आत अपघात घडतो आणि आईच्या डोळ्यांसमोरच तिच्या बाळाचं गंभीर अपघात होतो. आईने जीव तोडून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तिच्या डोळ्यांसमोरच ही शोकांतिका घडली. अपघात घडताच ती रस्त्यावरच कोसळते.
हा धक्कादायक व्हिडीओ इंस्टाग्रामवर @reshma.saifi.186 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, काही तासांतच याला १.६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. "एका आईसमोर तिच्या ३ वर्षाच्या बाळाचा झाला खतरनाक अपघात. रस्त्यावरून चालताना आपल्या मुलांची जास्त काळजी घ्या, प्लीज" अशी कळकळीची विनंती करणारी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.
या व्हिडीओवर नेटिझन्सकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी आईची घालमेल पाहून सहवेदना व्यक्त केली. एका युजरने लिहिलं, “ही आईची चूक आहे, बाळाचा हात धरायला हवा होता.” तर दुसऱ्याने म्हटलं, “ड्रायव्हरची काहीच चूक नाही, सगळं इतकं अचानक घडलं की तो काही करूच शकला नाही.”
दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु या अपघाताने एक गोष्ट नक्की अधोरेखित केलीय रस्त्यावर मुलांसोबत वावरणं म्हणजे जबाबदारीचं काम आहे. क्षणाचाही विसर आपल्या मुलांना गंभीर धोक्यात टाकू शकतो.
हा व्हिडीओ केवळ हृदय हेलावणारा नाही, तर पालकांसाठी एक मोठा धडा आहे रस्त्यावरच्या क्षणाक्षणाची किंमत समजून आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक सतर्क राहणं ही काळाची गरज आहे.
ही घटना कुठे घडली आहे?
अजूनपर्यंत या घटनेचे नेमके ठिकाण स्पष्ट झालेले नाही.
बाळाला नेमकी काय दुखापत झाली?
व्हिडीओमध्ये अपघात गंभीर दिसतो, पण बाळाची नक्की अवस्था स्पष्ट नाही.
आईची काही चूक होती का?
काही युजर्सच्या मते आईने बाळाचा हात धरला असता तर अपघात टळू शकला असता.
व्हिडीओ कुठे पाहायला मिळतो?
@reshma.saifi.186 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.