Esther Abrami’s Sweet Violin Session with Her Cat Charms the Internet esakal
Trending News

Violinist Cat Viral : 'व्हायोलिनवाली मांजर' होतीये सोशल मीडियावर तुफान व्हायरल, व्हिडीओ पाहिलात काय?

Cat Viral Video : मालकिणीसोबत स्वतःदेखील वाजवते व्हायोलिन,गोंडस मांजरीवर लोकांकडून प्रेमाचा वर्षाव

Saisimran Ghashi

Viral Video : कुत्रा हा माणसाचा सगळ्यात उत्तम मित्र असतो असं आपण नेहमी ऐकतो. पण सोशल मीडियावर व्हायरल वायोलिन वादक एस्तर अब्राहमी यांचं म्हणणं मात्र वेगळं आहे. त्यांच्या मते मांजर महिलांच्या खास मैत्रिणी असतात. विशेषत: ज्या महिलांना संगीताची आवड असते त्यांच्या!

एस्तर सोशल मीडियावर व्हीडिओ आणि फोटो शेअर करत असतात. यामध्ये त्यांच्या वायोलिन वादनाचा आणि त्यांच्या मांजरांचा सहभाग पाहायला मिळतो. रेमिला नावाची त्यांची मांजर त्यांच्या अनेक व्हीडिओमध्ये दिसते.

जवळपास चार वर्षांपूर्वी २०२४ मध्ये एस्तर यांनी दोन व्हिडीओ शेअर केले होते. यामध्ये त्या घरी सराव करताना दिसत आहेत आणि त्यांची मांजर रेमिला त्यांच्या कमरेला बांधलेल्या लहानशा पिशवीतून डोकावत आहे. सराव सुरू करताना रेमिला एस्तरच्या हातांच्या हालचालींचे अनुकरण करत त्यांच्या हाताची बोटं धरू पाहते. एवढंच नाही तर सराव संपल्यानंतर रेमिला त्याच पिशवीत झोपी जाते आणि एस्तर वादन सुरू ठेवतात. हा सुंदर व्हिडिओ नुकताच पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

व्हिडिओच्या मूळ कॅप्शनमध्ये एस्तर यांनी रेमिलाबद्दल माहिती दिली आहे. "रेमिला कुणीतरी सोडून गेले होते. पण तिला वाचवण्यात आले आणि आश्रयाला घेण्यात आले. मी एका आठवड्यासाठी तिची देखभाल केली. आल्यावर ती अतिशय कमकुवत होती, घाबरलेली होती आणि बाहेर राहिल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता," असं त्यांनी लिहिलं आहे.

"मग मात्र सात दिवस दूध आणि लाडानंतर रेमिला आता माझी सर्वात जवळची मैत्रीणी मांजरी बनली आहे. ती घरामध्ये माझ्या मागे सर्वत्र येते आणि जमिनीवर एकटी राहण्यास नकार देते. ती नेहमी माझ्या मांडीवर किंवा कमरेला बांधलेल्या लहान पिशवीत असते," असं त्या पुढे म्हणतात.

रेमिला ही एस्तर यांनी दत्तक घेतलेली एकमेव मांजर नाही. दुसऱ्या व्हीडिओमध्ये त्या सराव करताना पाठीच्या बॅगमध्ये दोन मांजरी दिसतात. या दोन्ही व्हिडिओंच्या कमेंट बॉक्समध्ये लोकांनी मांजरीच्या गोडव्याचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT