A Gujarat woman seen crying on the street while demanding panipuri, video goes viral on social media.
esakal
Gujarat woman crying on the street for Panipuri : पाणीपुरी हा अनेकाचा सर्वात आवडता पदार्थ असतो. विशेषकरून महिलावर्ग पाणीपुरीचा खास चाहता असतो, अनेक महिलांची पाणीपुरी म्हणजे कमजोरी असते. पाणीपुरी खाण्यासाठी या महिला कोणतीही वेळकाळ पाहत नसतात किंवा कुठेही कधीही जाण्याचीही काहींची तयारी असते.
अशाच एका पाणीपुरी प्रेमी असणाऱ्या गुजरातमधील वडोदरा येथील महिलेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. गुजरात तसं खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे, येथील खमंग पदार्थांची जगभरात मागणी असते. मात्र या गुजरातमध्ये आता पाणीपुरीचेही किती चाहते आहेत, हे या व्हिडिओमधून दिसत आहे.
वडोदरा येथील सुरसागर तलावाजवळ भररस्त्यात एक महिला बसून मोठ्याने रडत होती. तर ही महिला नेमकी का रडते आहे, हे जेव्हा जाणून घेण्याचा प्रय़त्न झाला तेव्हा अनेकांना धक्काच बसला. कारण, जेव्हा तिने सांगितले की ती पाणीपुरी खाण्यासाठी आली होती मात्र पाणीपुरी विक्रेत्याने तिला २० रुपयांना सहा पाणीपुरी देण्याऐवजी चारच दिल्या आहेत आणि उर्वरीत दोन पाणीपुरी तो देत नाही. यामुळे तिला प्रचंड वाईट वाटत आहे.
ही महिला त्या पाणीपुरी विक्रेत्यावर चांगलीच संतापली देखील होती आणि जोपर्यंत दोन पाणीपुरी देत नाही तोपर्यंत रस्त्यावरू उठणार नाही, अशी तिने भूमिका घेतली होती. दरम्यान, रस्त्यावर यामुळे गर्दी होवू लागल्याने पोलिसही दाखल झाले.
यावर त्या महिलेची पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा तिने, हा पाणीपुरीवाला सगळ्यांना २० रुपयांच्या सहा पाणीपुरी देतोय अन् मला चारच दिल्या आहेत. एकतर त्याने मला उर्वरीत दोन पाणीपुरी द्याव्यात किंवा त्याच पाणीपुरीचा गाडा येथून हटवा, अशी तिने रडत रडत मागणी केली. यावर पोलिस चकरावले परंतु त्यांनी कसेबसे त्या महिलेला तेथून बाजूला केले व वाहतूक सुरळीत केली. यानंतर पोलिसांची याप्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. परंतु तोपर्यंत या महिलेच्या या अनोख्या ठिय्या आंदोलनाचा व्हिडिओ जगभर व्हायरल झालेला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.