Viral Video news 
Trending News

Viral Video : जिममध्ये जाऊन साडीत केला वर्कआउट, महिलेची आश्चर्यचकित करणारी मेहनत

सकाळ डिजिटल टीम

फिटनेस बाबत आणि आरोग्याबाबत सजग असणारे लोक खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देतात. याशिवाय ते लोग जिम वर्कआऊटवर देखील लक्ष देतात. जिममध्ये लोक टाइट्स शॉर्ट्स, टी-शर्ट किंवा लोअर परिधान केलेले दिसतात. कारण या कपड्यांमध्ये व्यायाम करणे सोपे जाते.

तसेच जिममधील वेगवेगळ्या मशिल हाताळणे सोपे जाते. मात्र एका महिलेने चक्क साडीत वर्कआउट केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

इंस्टाग्रामवर reenasinghfitness या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एक महिला साडी नेसून जिममध्ये पोहचली आहे. ही महिला साडीत वर्कआऊट करत आहे.

महिलेनची मेहनत पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. 

साडी भारतातील सर्वात सुंदर आणि पारंपारिक पोशाख आहे. कोणत्याही स्त्रीचे सौंदर्य साडीमध्ये चांगले शोभते. पण जेव्हा साडी नेसलेली एक महिला जिममध्ये पोहोचते तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.

कारण असे क्वचितच पाहिले गेले असेल. साडीत व्यायाम करणे सोपे नाही. असे असूनही, महिला तिच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये कुठेही डगमगली नाही किंवा संकोच केला नाही. उलट ती प्रत्येक व्यायाम पूर्ण आत्मविश्वासाने करताना दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

SCROLL FOR NEXT