Pregnant without Husband Sakal
Trending News

नवरा परदेशात, इकडे पत्नी राहिली गर्भवती; म्हणाली, स्वप्नात येत होता नवरा | Pregnant without Husband

पत्नीने तिच्या नवऱ्यासहित कुटुंबियांना धमकी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पटना : बिहारमधील भागलपूर येथे एक धक्कादायक बाब उघडकीस आली असून नवरा परराज्यात असतानाही बायको गर्भवती राहिली आहे. या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. भागलपूर येथील जगदीशपूर परिसरातील महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करून ही बाब उघडकीस आणली आहे.

दरम्यान, महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा मोठा भाऊ मागच्या सात महिन्यापासून कामाच्या निमित्ताने कोलकत्ता येथे गेला आहे. पण तिच्या भावाची बायको तीन महिन्याची गर्भवती आहे. हे कसं शक्य आहे? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. त्याचबरोबर वहिनीच्या पोटात असलेल्या बाळाची डीएनए टेस्ट करण्याची मागणीसुद्धा सदर महिलेने पोलिसांकडे केली आहे.

अधिक माहितीनुसार, महिलेच्या मोठ्या भावाचं पाच वर्षापुर्वी लग्न झालं आहे. त्यांना दोन वर्षाची एक मुलगी आहे. पण मागच्या सात महिन्यापासून तो कोलकत्ता येथे कामानिमित्ताने गेला होता. परत आल्यावर त्याला समजले की, आपली पत्नी तीन महिन्याची गर्भवती आहे. यासंबंधी जाब विचारला असता पत्नीने सांगितलं की, "ते माझ्या स्वप्नात येत होते त्यामुळे गर्भ राहिला."

त्यानंतर महिलेचा फोन तपासला असता तिच्या फोनमध्ये एका मुलाचा नंबर आढळून आला. त्या मुलासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून तिला गर्भधारणा झाल्याची माहिती आहे. तिच्या नवऱ्याने तिला घरी ठेवण्यास मनाई केल्यानंतर तिने घरच्यांना धमकी दिल्याचा आरोप तिच्या ननंदेने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT