Viral Video Sakal
Trending News

Viral Video : मद्यधुंद अवस्थेत कारवर चढून शिवीगाळ; भररस्त्यात तरूणीचा ड्रामा

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथून एक धक्कादायक माहिती समोर आली असून मद्यधुंद अवस्थेतील एक तरूणी कारच्या बोनेटवर चढून ड्रामा करत आहे. त्याचबरोबर ती रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास देत असून या तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तिच्या या कारनाम्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी एका कारच्या बोनेटवर चढलेली दिसत आहे. कार सिग्नलवर थांबल्यानंतर ती बोनेटवर चढून शिवीगाळ करत आहे. तर सिग्नल सुटल्यानंतर वाहने बाजूने निघून जाताना दिसत आहेत. या तरूणीच्या राड्यामुळे रस्त्यावरील इतर वाहनांना नाहक त्रास होत होता.

दरम्यान, ती एका दुचाकीस्वार व्यक्तीला त्याच्या गाडीवरून खाली उतरवते आणि त्याच्या गाडीवर बसते. ती कुणाचेही काहीच ऐकण्याच्या तयारीत नसते. त्यानंतर तिने रस्त्यावरील बॅरिगेट्स सुद्धा पाडले आहेत. त्यानंतर काही महिलांनी तिला आवरण्याचा प्रयत्न केला.

पण तरीही ती शांत बसण्याच्या तयारीत नव्हती. काही वेळानंतर पोलीस आल्यानंतर तिला शांत करण्यात आले. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या असून मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT