baba ramdev reaction on union budget 
Union Budget 2026 Updates

'मी माझं सर्वस्व देईन; यापेक्षा चांगलं बजेट तयार करा'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी 2021-22 साठी अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. तर विरोधकांनी अर्थसंकल्पावरून टीकाही केली. अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना कोणताही फायदा होणार नाही असं विरोधकांनी म्हटलं आहे. बाबा रामदेव यांनी विरोधकांवर यावरून निशाणा साधला. 

स्वामी रामदेव म्हणाले की, जर एखादा नेता असा परिस्थितीत चांगलं बजेट तयार करून दाखवणार असेल तर त्याला जिंकून देण्यासाठी मी माझं सर्वस्व देण्यास तयार आहे.  अर्थसंकल्पावरून रामदेव बाबांनी म्हटलं की, सरकार निती तयार करू शकते. जर शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर डेअरी उद्योग वाढवावा लागेल. अशा परिस्थितीत डेअरी उद्योगाला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्यासाठी जे हवं ते सरकारने दिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या घरी दोन चार गाई, म्हैशी, बकऱ्या पाळता येतील.

खाद्य तेलांबाबत बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, आम्ही जवळपास दोन लाख कोटी रुपयांचे खाद्य तेल आयात करतो. जर ते आपल्याच देशात तयार झालं तर पाच वर्षांच्या आत कमीत कमी 12 ते 15 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. अशा परिस्थितीत सरकारकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांबाबत पूर्ण प्लॅनिंग आहे. यासाठी सरकारसोबतच शेतकऱ्यांनासुद्धा काम करावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT