budget 2021 nirmala sitharaman look saree lal pad 
Union Budget 2026 Updates

निर्मला सीतारमण यांच्या साड्यांची चर्चा; अर्थसंकल्पानंतर वेगळा लूक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केल्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांच्या साडीची चर्चा रंगली आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी लाल आणि पांढऱ्या रंगाची रेशमी साडी नेसली होती. निर्मला सीतारमण यांनी आतापर्यंत तीन अर्थसंकल्प सादर केले आहेत. यावेळी पुन्हा एकदा लाल आणि पांढऱ्या रंगाच्या साडीच्या माध्यमातून त्यांनी हँडलूमबाबतचं त्यांचं प्रेम दाखवलं आहे. सोनेरी रंगाचा काठ असलेली आणि ऑफ व्हाइट डिटेलिंगची लाल साडी नेसून निर्मला सीतारमण बजेट सादर करण्यासाठी संसदेत पोहोचल्या होत्या. 

निर्मला सीतारमण यांनी नेसलेल्या साडीचं बंगाल कनेक्शनही आहे. बंगालमध्ये या साडीला लाल पाड म्हटलं जातं. बंगालमध्ये शुभ प्रसंगी ही साडी परिधान केली जाते. बंगाली साड्यांपैकी एक खास साडी म्हणून लाल पाडची ओळख आहे. धार्मिक कार्यक्रमांसह विशेष प्रसंगी ही साडी नेसली जाते. याशिवाय झारखंडमध्येही या साडीला विशेष महत्त्व आहे. दुर्गा पूजा, सिंदूर खेला यावेळी साडी नेसतात. 

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारमण वेगळ्या लूकमध्ये दिसल्या. याचीही चर्चा रंगली होती.  निर्मला सितारामण यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये पिवळ्या रंगाची आणि राखाडी रंगाची लाईनची साडी नेसली होती. या सोनेरी रंगाची किनार होती. बजेटवेळी साडी वेगळी होती. त्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरसला वेगळा लूक केला होता

देशाचा अर्थसंकल्प पहिल्यांदा पेपरलेस स्वरुपात सादर केला गेला. ब्रीफकेसमधून आणला जाणारा अर्थसंकल्प बहीखात्यातून आणला जात होता. यावेळी तो टॅबलेटवरून सादर केला गेला. तसंच यावर राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभही होता. यंदाचा अर्थसंकल्प खासदारांसह जनतेसाठी ऑनलाइन उपलब्ध असेल. यासाठी युनियन बजेट अॅपही लाँच करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT