Honorable while giving letter regarding compensation to the victim in the National High Court. esakal
उत्तर महाराष्ट्र

National Lok Adalat : 17 हजारांवर प्रकरणे निकाली; अपघात प्रकरणात पीडितांना 1 कोटीवर भरपाई

सकाळ वृत्तसेवा

National Lok Adalat : जिल्ह्यात शनिवारी (ता. ९) झालेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीत एकूण १७ हजार ९१९ प्रकरणे निकाली निघाली.

यातून तब्बल २० कोटी सात लाखांवर तडजोड रक्कम वसूल झाली, अशी माहिती धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप वि. स्वामी यांनी दिली.(1 crore compensation to victims in accident cases dhule news)

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार संपूर्ण धुळे जिल्ह्यात शनिवारी (ता. ९) राष्ट्रीय महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या महालोकअदालतीमध्ये सहा हजार ९९३ प्रलंबित प्रकरणे व सुमारे ८३ हजार ७६५ न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची अशी एकूण ८९ हजार ९५८ प्रकरणे ठेवण्यात आली.

त्यांपैकी प्रलंबित ३९२ व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची १७ हजार ५२७ अशी एकूण १७ हजार ९१९ प्रकरणे निकाली निघाली. ही प्रकरणे निकाली काढताना झालेल्या प्रक्रियेत २० कोटी सात लाख १९ हजार २२८ रुपये इतकी तडजोडीची रक्‍कम लोकअदालतीत वसूल झाली.

पाच दांपत्यांचा पुन्हा संसार

या राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवलेल्या कौटुंबिक वादाच्या एकूण प्रकरणांपैकी पाच प्रकरणांत आपसात यशस्वीरीत्या तडजोड झाली. त्यामुळे संबंधित दांपत्यांचा पुन्हा संसार सुरू झाला.

एक कोटीवर भरपाई

मोटार अपघात नुकसानभरपाईच्या एका प्रकरणामध्ये पीडित व्यक्तींना एक कोटीवर नुकसानभरपाई मिळवून देण्यात आली. या प्रकरणात एका तरुणाचे निधन झाले होते. त्यांच्या मागे त्यांची तरुण विधवा पत्नी, मुलगा व वयस्कर आई-वडील असा परिवार होता.

या प्रकरणात इन्शुरन्स कंपनी व त्यांच्या वकिलांच्या सहकार्याने संबंधित गरजू कुटुंबाला पॅनलप्रमुख जिल्हा न्यायाधीश-७ एस. सी. पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या समझोता घडवून आणला. यातील महिला पक्षकार व तिच्या कुटुंबीयांना तडजोड करून पीडित व्यक्तींना सुमारे एक कोटी ३१ लाख ८३ हजार ७८६ रुपये नुकसानभरपाई तत्काळ अदा करण्यात आली.

या लोकअदालतीसाठी सर्व पक्षकार, न्यायाधीश, धुळे जिल्हा वकील संघाचे सदस्य, तालुका वकील संघ, पोलिस व कर्मचारी यांनी सहकार्य केले. याबद्दल धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे व न्यायाधीश तथा सचिव स्वामी यांनी आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Negative Energy Remedies: आजपासून चातुर्मास सुरू, रात्री करा 'हे' चमत्कारिक उपाय, नकारात्मकता राहील दूर

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

SCROLL FOR NEXT