crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : बालिकेवरील अत्याचार प्रकरणी एकास 10 वर्षे सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : बालिकेवरील अत्याचार प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने एकाला दोषी ठरवत दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. गिरप्पा ऊर्फ गिरिधर भामरे (वय ४२) असे आरोपीचे नाव आहे.

जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी हा निकाल दिला. (10 years rigorous imprisonment for one in case of girl child physical abuse dhule crime news)

साक्री तालुक्यातील एका खेड्यात नऊ वर्षीय बालिका ७ सप्टेंबर २०१८ ला घरी एकटी असताना आरोपी गिरिधर गोविंदा भामरे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक अशोक अहिरे यांनी घटनेचा तपास करून संशयित गिरिधर भामरे याच्याविरूद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश यास्मीन देशमुख यांच्यापुढे चालले. सरकारी अभियोक्ता शुभांगी जाधव यांनी पीडितेची बाजू मांडली. सरकार पक्षातर्फे पाच जणांच्या महत्त्वाच्या साक्षी नोंदवल्या.

उपलब्ध पुरावे, संदर्भ व युक्तिवादानंतर न्यायाधीश श्रीमती. देशमुख यांनी गिरिधर भामरे याला दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अ‍ॅड. शुभांगी जाधव यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन लाभले. पैरवी अधिकारी म्हणून दत्तू सूर्यवंशी व सुशीला वळवी यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाई होणार?

World Record : भारताने मोडला रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात अशी अविश्वसनीय कामगिरी करणारी पहिली टीम

Viral Video: धावत्या ट्रेनमधील स्टंटवर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले धाडस की..! पाहा व्हायरल व्हिडिओ

IND vs PAK: भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं 'धुरंधर' स्टाईल सेलिब्रेशन अफगाणिस्तान अन् बलुचिस्तानमध्ये? Video होतायेत Viral

SCROLL FOR NEXT