Gutkha seized by police officers and staff with suspects. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : पिंपळनेर येथे पानमसाल्यासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना मटका तस्करी करणाऱ्या वाहनासह अकरा लाख ८० हजार ७७८ रुपये किमतीचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी जप्त करत दोन संशयितांना ताब्यात घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथील कुडाशी रोडलगत मराठा दरबार हॉटेलजवळ रविवारी (ता. ४) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना मटका तस्करी करणाऱ्या वाहनासह अकरा लाख ८० हजार ७७८ रुपये किमतीचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी जप्त करत दोन संशयितांना ताब्यात घेतले.

पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना वाहनात (एमएच १४, व्हीजे ०३२८) प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे आढळले. (12 lakh worth of valuables including panamsala seized at Pimpalner dhule crime news)

पोलिसांनी वाहनचालकाला त्याचा परिचय विचारला असता त्याने त्याचे नाव मुक्तार अहमद मुंजर अहमद (वय ४२, रा. मालेगाव किल्लाजवळ, जि नाशिक) असे सांगितले.

दुसऱ्या व्यक्तीचे नाव अफजल अहमद मोहमद शफिक (वय ३२, रा. मालेगाव, आझादनगर, जि. नाशिक) असे आहे. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता पानमसाला, तंबाखूचा साठा मिळून आला.

या प्रकरणी पानमसाला व सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारा चालक, मुद्देमाल मालक, वाहनाचा मालक, पुरवठादार व मुद्देमाल कोणाकडे जात आहे.

यांच्याबाबत आवश्यक तपास होण्याकामी अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या खबरीवरून तक्रार दाखल केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित माळी तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT