तळोदा : तळोदा शहरात प्लॅस्टिकमुक्ती मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत सोमवारी १३ किलो प्लॅस्टिक व्यावसायिकांकडून जप्त करण्यात आले. पालिकेच्या स्वच्छता पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, प्लॅस्टिकमुक्त मोहीम सुरूच राहणार असून, दररोज तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात प्लॅस्टिकबंदी असूनही प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो. प्लॅस्टिकबंदी मोहिमेंतर्गत नागरिकांची जनजागृती करून नागरिकांना कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन केले जाते. (13 kg of Plastic caught in plastic ban campaign Action of municipal team Nandurbar News)
मात्र तरीदेखील प्लॅस्टिकमुक्ती होताना दिसून येत नाही. त्यामुळे तळोदा पालिकेंतर्गत शहरातील व्यावसायिकांकडे तपासणी करून पालिकेच्या पथकाने प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. यात सोमवारी १३ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
या मोहिमेंतर्गत प्लॅस्टिकबंदीसाठी बाहेरील पथकदेखील अचानक छापा टाकून प्लॅस्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी प्लॅस्टिकबंदी मोहिमेत सहभागी होऊन प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेत पालिकेचे आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी, शहर समन्वयक आकाश हासे, अजय गोजरे, मोतीलाल गोजरे, राकेश गोजरे, सुरेंद्र वळवी, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, प्लॅस्टिकबंदी मोहिमेत सरसकट सर्वच व्यावसायिकांना या मोहिमेत सहभागी करून घ्यावे व शहर प्लॅस्टिकमुक्त करावे, अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.