Agriculture and police officers inspecting stock of fake fertilizers in a godown in MIDC.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : धुळ्यात 13 लाखांवर बनावट खत जप्त; कृषी यंत्रणेचा गोडाऊनवर छापा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : कृषी यंत्रणेने येथील अवधान शिवारातील एमआयडीसीत दोन गोडाऊनमध्ये छापा टाकत १३ लाख ३५ हजार किमतीचा बनावट खतसाठा जप्त केला.

या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. ८) रात्री दहाला गुजरात, सातारा जिल्ह्यातील संबंधित कंपनीसह अनधिकृत साठेबाज नरेंद्र श्रीराम चौधरी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. (13 lakh fake fertilizer seized in Dhule crime news)

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरूण तायडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार येथील एमआयडीसीतील लक्ष्मी वे ब्रीजच्या पूर्वेकडे पत्राच्या दोन शेडवजा गोडाऊनमध्ये विनापरवाना, अनधिकृत रासायनिक खताचा साठा असल्याची माहिती मिळाली.

नंतर विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. तायडे, उपविभागीय कृषी अधिकारी बापू गावीत, जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी प्रदीपकुमार निकम, तालुका कृषी अधिकारी वाल्मिक प्रकाश, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी नितेंद्र पानपाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अभय कोर, राजेशकुमार चौधरी यांनी शासकीय पंच न्याहळोदचे (ता. धुळे) कृषी सहायक पृथ्वीराज परदेशी, लामकानीचे (ता. धुळे) कृषी सहायक सुरेश कराळे यांनी संशयित दोन गोडाऊनवर छापा टाकला.

दोन कंपन्यांचा सहभाग

चौकशीत संबंधित गोडाऊन सुरेश पाटील (रा. अवधान) यांच्या मालकिचे असून त्यांनी ते नरेंद्र श्रीराम चौधरी (रा. धुळे) यांना भाडेतत्त्वावर दिल्याची माहिती गोडाऊनचा कर्मचारी सुरेश शालिग्राम सूर्यवंशी (रा. शेलारवाडी, चितोड रोड) याने दिली. नरेंद्र चौधरी हा भूमी क्रॉप सायन्स फर्मद्वारे खत साठविणे व विक्रीचे कामकाज करतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याला चौकशी पथकाने घटनास्थळी बोलावले. त्यावेळी त्याने सुरत (गुजरात) येथील मे. फार्म सन्स फर्टीकेम प्रा. लि. कंपनीकडून खत खरेदी करतो व तरडगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथील मे. ग्रीन फिल्ड ॲग्रीकेम इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीच्या नावाने छपाई असलेल्या गोण्यांमध्ये भरून सील करतो व विक्री करतो, असे चौकशी पथकाला सांगितले.

मोहाडीत गुन्हा दाखल

पथकाला गोण्यांमध्ये कृषी सम्राट या नावाचे १८ः१८ः१० मिश्र खताच्या ५० किलो वजनाच्या गोण्या आढळल्या. कृषी राजा, कृषी सम्राट नामक १३ लाख ३५ हजाराचा बनावट खतसाठा दोन्ही गोडाऊनमध्ये आढळला. तसेच सुरतमधील कंपनीची चार बिले, दोन रबरी शिक्के पंचनाम्यावेळी आढळले. पथकाने बनावट खताचे नमुने नाशिकला प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले.

या प्रकरणी खत उत्पादन, विक्रीचा परवाना नसताना नरेंद्र चौधरी याने आर्थिक लाभासाठी सुरत, तरडगाव येथील कंपनीकडून संशयित बनावट खत खरेदी करून विक्रीच्या हेतूने साठा करीत संगनमाताने शेतकरी, शासनाची फसवणूक केली म्हणून दोन्ही कंपन्यांसह चौधरी याच्याविरूद्ध विविध कलमान्वये मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT