checkpost esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : जिल्ह्यात 15 चेकपोस्ट कार्यान्वित; पोलिस अधीक्षक पाटील यांची संकल्पना

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील शहरांमध्ये येण्याचे ठिकाण व बाहेर पडण्याचे ठिकाण याबाबत आढावा घेऊन जिल्ह्यांतर्गत व गुजरात/मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेलगत नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत १५ चेकपोस्ट स्थापन करून तेथे आठ पोलिस अधिकारी व ३६ शस्त्रधारी पोलिस अंमलदार तैनात केले आहेत.

शहरात येणाऱ्या व शहरातून जाणाऱ्या सर्व लहान-मोठ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे. चेकपोस्ट २४ तास तैनात राहणार आहेत. (15 checkposts operational in district nandurbar news)

पोलिस ठाणेनिहाय चेकपोस्टचे ठिकाण ः

नंदुरबार शहर ः १) साक्री नाका, २) कोरीट नाका, ३) बायपास उड्डाणपूल (शहाद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर)

उपनगर ः नळवा नाका, धानोरा नाका (खांडबाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर)

नंदुरबार तालुका ः ठाणेपाडा नाका

नवापूर ः बेडकी नाका

विसरवाडी ः खांडबारा चौफुली

शहादा ः दरा फाटा

सारंगखेडा ः अनरद बारी नाका

म्हसावद ः खेडदिगर नाका

धडगाव ः भुशा नाका, काकरपाटी नाका

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अक्कलकुवा ः मोलगी रोड नाका

तळोदा ः कुकरमुंडा फाटा नाका

तेवीस लाखांची जनावरे जप्त

बुधवारी (ता. १४) म्हसावद पोलिस ठाणे हद्दीतील म्हसावद ते धडगाव रस्त्यावर रामपूर गावाच्या फाट्यावर चेकपोस्टवर नाकाबंदीदरम्यान १) वीरसिंग वनकर पावरा (वय २१, रा. चिखली, ता. धडगाव), नानशा जहाँगीर पावरा (१९, रा. बोरी, ता. धडगाव) व अल्पवयीन मुलगा हे त्यांच्या ताब्यातील वाहनांमध्ये गुरांना अतिशय निर्दयतेने कोंबून पाय व मान बांधून बेकायदा वाहतूक करताना मिळाल्याने त्यांच्या ताब्यातून २३ लाख दोन हजार रुपये किमतीची २६ गुरे व तीन वाहने असा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्याविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविणे, प्राणीसंरक्षण (सुधारणा) अधिनियम, मोटार वाहन कायदा तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी व मुद्देमाल म्हसावद पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस नाईक जितेंद्र अहिरराव, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोलिस अंमलदार दीपक न्हावी, किरण मोरे, अभिमन्यू गावित यांनी केली आहे.

पोलिस अधीक्षकांची भेट

जिल्हा पोलिस दलातर्फे उभारण्यात आलेल्या चेकपोस्टच्या ठिकाणी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी भेट देत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करताना नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही, तसेच काही संशयास्पद मिळून आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात

यावी याबाबत उपस्थित पोलिस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. नाकाबंदीच्या ठिकाणी अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

AirPods 5 India Price: 5 तासांची बॅटरी अन् वायरलेस चार्जिंग! Appleने लाँच केले सर्वात स्वस्त ANC इयरबड्स; पहा खास फीचर्स...

Marathi News Live Updates : मुंबईला जाणारच, १२ तारखेला घोषणा करणार - मनोज जरांगे पाटील

SCROLL FOR NEXT