robbery
robbery esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : परप्रातीयांकडून लाखाची रोकड जप्त; शिरपूर पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि.धुळे) : चांदपुरी (ता. शिरपूर) येथे घरफोडी करून तीन लाखांची रोकड चोरून नेल्याच्या गुन्ह्यात दोन परप्रांतीय संशयितांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी दडवून ठेवलेली एक लाख पाच हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. (2 foreign suspects have been detained by city police in case of burglary theft rs 3 lakh dhule crime news)

नोव्हेंबर २०२२ मध्ये चांदपुरी गावात संजय मगन पटेल यांच्या राहत्या घराचा मागील बाजूचा दरवाजा तोडून संशयितांनी कपाटातील तीन लाख दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. या चोरीबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

त्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना घरफोडीत परप्रांतीय संशयितांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या आदेशावरून उपनिरीक्षक किरण बाऱ्हे व शोधपथकाने तपास केला असता संशयित किर्तल्या शिवराम तडवी व जतन रूमसिंग मोरे (दोघे रा. मोहाला, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) हे नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात नंदुरबार कारागृहात असल्याची माहिती मिळाली.

कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिरपूर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. चौकशीत संशयितांनी चांदपुरी येथील घरफोडीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबूल केले. संशयित जतन मोरे याच्या मध्य प्रदेशातील घरात लपवून ठेवलेली एक लाख पाच ६०० रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

संशयित अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. त्याव्यतिरिक्त सेंधवा शहर, सेंधवा ग्रामीण, शिरपूर तालुका पोलिस ठाणे, नंदुरबार पोलिस ठाणे आदी ठिकाणीदेखील त्यांच्यावर गुन्हे दाखल असून, त्यांच्या अटकेनंतर अन्य काही गुन्हे उजेडात येण्याची शक्यता आहे.

यांनी केली कारवाई

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, हवालदार ललित पाटील, लादुराम चौधरी, पोलिस नाईक मनोज पाटील, उमाकांत वाघ, गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार, सचिन वाघ व महिला पोलिस अनिता पावरा यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT