Bogus seeds were caught in raids conducted by the Agriculture Department  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : 2 लाखांचे अनधिकृत कपाशी बियाणे जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : खापर (ता. अक्कलकुवा) येथील एका ॲग्रो एजन्सीवर कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकत दोन लाखांचे अनधिकृत एचटीबीटी कपाशी बियाणे जप्त केले. या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (2 lakh worth of unauthorized cotton seeds seized nandurbar crime news)

खापर येथे गणेश मनोज मराठे, मुकेश मोहन मराठे यांच्या मिराई ॲग्रो एजन्सी येथे अनधिकृत कापूस (एचटीबीटी), वाहतूक, साठवणूक व विक्रीबाबत गुप्त माहिती होती. त्यातच कृषी विभागाच्या पथकाने खापर व परिसरात अनधिकृत कपाशी एचटीबीटी बियाणे दाखल झाल्याची बातमी मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारे जिल्हा भरारी पथक या ॲग्रो एजन्सीवर दाखल झाले. त्या वेळी तपासणी केली असता दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत सीलबंद तीन पोती बियाणे आढळून आले. या बियाण्याबाबत गणेश मनोज मराठे (रा. खापर) यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

भरारी पथकासमक्ष हे पोते उघडले असता दोन लाख चार हजार ४०० रुपये किमतीचे अनधिकृत कपाशी एचटीबीटी बियाण्याची १४६ पाकिटे आढळून आली. या कारवाईंतर्गत भरारी पथकातील मोहीम अधिकारी जे. एस. बोराळे यांनी गणेश मनोज मराठे, मुकेश मोहन मराठे, मिराई ॲग्रो एजन्सी यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही कारवाई गटविकास अधिकारी पुलकित सिंह यांच्या उपस्थितीत तसेच विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तानाजी खर्डे, कृषिविकास अधिकारी प्रकाश खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. भरारी पथकात तालुका कृषी अधिकारी नीलेश गढरी, तंत्र अधिकारी, विजय मोहिते, कृषी अधिकारी योगेश हिवराळे यांचा समावेश होता.

शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानांवरूनच बियाणे खरेदी करावे, त्यामुळे बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT