LCB team present after the investigation of the arrested suspects in the copper wire case. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : दरोडेखोरांच्या टोळीमधील संशयित 2 जणांना बेड्या; 2 दुचाकी जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : छडवेल कोर्डे (ता. साक्री) येथे स्वस्तातील तांब्याचे तारेचे आमिष दाखवून इंदूर (मध्य प्रदेश) व मुंब्रा (जि. ठाणे) येथील व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या जामदा येथील टोळीचा एलसीबीने अवघ्या चोवीस तासांत पर्दाफाश केला. टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या.

या कारवाईत गुन्ह्यातील दोन दुचाकीही जप्त केल्या. टोळीत दहा जणांचा समावेश आहे. त्यातील सात संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. (2 suspects in gang of robbers arrested by police dhule news)

जामदा (ता. साक्री) येथील एका टोळीने फेसबुकवरून मुखधूम मेहबूब खान (रा. दोस्ती प्लॅनेट, एल मोर सी खोली क्र. २३०२, शिळ फाटा, मुंब्रा, जि. ठाणे) या व्यापाऱ्याला स्वस्तात तांब्याची तार देण्याचे आमिष दाखवून गावात बोलविले.

त्यानुसार मखधूम खान ४ ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास मुलगा आवेश व त्यांचा मित्र अमित कुमार जैन (रा. इंदूर, मध्य प्रदेश) यांना सोबत घेत छडवेल कोर्डे येथे आले. तांब्याची तार दाखविण्याच्या बहाण्याने काहींनी त्यांना पेटले गावातील पवनचक्कीजवळ नेले.

तेथे आधीच दबा धरून बसलेल्या आठ ते दहा जणांनी मुखधूम मेहबूब खान यांच्याकडील तीन मोबाईल व रोकड असा ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. या प्रकरणी खान यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (ता. ५) निजामपूर पोलिस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद झाली.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांची जिल्हा वार्षिक तपासणी सुरू असताना या गुन्ह्याची उकल करण्याचा आदेश त्यांनी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांना दिला.

तपासात एलसीबीने संशयित नीलेश जहागीर चव्हाण व उज्ज्वल संतू भोसले (रा. जामदा) यांना ताब्यात घेतले.

अधिक चौकशीत त्यांनी सूरज चव्हाण, भोलाराम भोसले, पी. के. पाटील, जॉनी भोसले, प्रदीप चव्हाण (सर्व रा. जामदा) यांची नावे सांगितली. सर्वांनी मिळून गुन्हा केल्याची दोघांनी कबुली दिली. तपासात नीलेश चव्हाण, जॉनी भोसले व प्रदीप चव्हाण या तिघांवर निजामपूरसह सोनगीर (ता. धुळे) पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, हेमंत बोरसे, संदीप पाटील, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, रविकिरण राठोड, मायूस सोनवणे, हर्शल चौधरी, गुणवंत पाटील, राजू गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

दरोडेखोरांनी लुटल्याची घटना घडल्यानंतर इंदूर (मध्य प्रदेश) येथील व्यापारी अमित कुमार जैन बेशुद्धावस्थेत आढळले होते. त्यांना जैताणे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे कारण समजले नाही, अशी नोंद निजामपूर पोलिस दप्तरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT