2 were robbed at gunpoint dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : जवाहर सूतगिरणीजवळ बंदुकीच्या धाक दाखवत दोघांना लुटले

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : धुळे-साक्री महामार्गावरील जवाहर सूतगिरणीच्या गेटजवळ (ता. धुळे) तीन अनोळखी व्यक्तींनी फोटोग्राफरच्या चेहऱ्यावर मिरचीपूड फेकून बंदुकीचा धाक दाखवत पाच हजारांची रोकड, मोबाईल व पंधरा हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, असा मुद्देमाल लुटून नेला.

चेहऱ्यावर कापड बांधून आलेल्या तिघांनी ही लूट केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. (2 were robbed at gunpoint dhule crime news)

या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

या संदर्भात फोटोग्राफर भीमा श्रीराम हिरे (वय ३५, रा. फुलेनगर, साक्री रोड, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार १४ ऑगस्टला रात्री साडेदहाला चंदना नाना अहिरे यांच्यासोबत वेगवेगळ्या दुचाकीने मोराणे जवाहर सूतगिरणीजवळ तोंडावर मिरचीपूड फेकून दोघांना रात्री संशयितांनी लुटले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तीन अनोळखी व्यक्तींनी हिरे यांना थांबविले. बंदुकीचा धाक दाखवून चेहऱ्यावर मिरचीपूड फेकली व हजार रुपयांची रोकड, चार हजार किमतीचा मोबाईल, चंदना अहिरे यांच्या पर्समधून पाच हजार किमतीचा मोबाईल, तीन हजारांची रोकड तसेच पंधरा हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. नंतर तिघेही धुळ्याकडे पसार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT