drowing in nala esakal
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार : नाल्याच्या पुरात मासेमारी करताना 2 तरुण बेपत्ता

नाल्यात मासे पकडत असताना अचानक नाल्याला पूर आल्याने ते दोघे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले.

प्रतीक जोशी

नंदुरबार : जांभीपाडा (ता.नंदुरबार) येथे मासेमारी करीत असताना नाल्याला अचानक पूर आल्याने दोन तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना काल (ता.१५) घडली. (Latest Marathi News)

जांभीपाडा (ता. नंदुरबार) येथील गुरुदीप दिलीप पाडवी (वय २८) व गणेश मोतू पाडवी (वय ४०) हे काल (ता.१५) दुपारी साडेतीनच्या सुमारास गावाजवळ असलेल्या नाल्याच्या फरशी पुलावर मासे पकडण्यासाठी गेले होते.

नाल्यात मासे पकडत असताना अचानक नाल्याला पूर आल्याने ते दोघे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. तेव्हा आकाश दिलीप पाडवी हे त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, तेही पाण्यात वाहू लागले. त्यांना इतर लोकांनी काठीच्या साह्याने बाहेर काढून वाचविले. मात्र, गुरुदीप पाडवी व गणेश पाडवी हे पाण्यात वाहून गेले. त्यांचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाहीत. आकाश पाडवी यांच्या माहितीवरून उपनगर पोलिस ठाण्यात मीसिंगची नोंद करण्यात आली आहे. हरवलेली व्यक्तिमिळून आल्यास उपनगर पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT