21 lakh extorted from an old man by luring with job Dhule fraud Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : नोकरीचे आमिष दाखवून वृद्धाला 21 लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील एकाच कुटुंबातील तिघांना आरोग्य सेवा संचालनालयात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून २० लाख ७५ हजारांत गंडवण्यात आले.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल झाला. (21 lakh extorted from an old man by luring with job Dhule fraud Crime)

निवृत्त कर्मचारी दिनकर मार्तंड तांबे (रा. सेवादासनगर, चितोड रोड, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार चंद्रभान जवरीलाल ओसवाल (दुधडेअरी रोड, धुळे) हे ओळखीचे आहेत. त्यांचा एकमेकांशी संपर्क आहे.

मुलाला नोकरी नाही, शासकीय नोकरी मिळाली तर बरे होईल, असे त्यांच्यात कायम संवाद होत असे. याचा चंद्रभान ओसवाल यांनी गैरफायदा घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. तांबे यांना विश्वासात घेऊन मुलगा, मुलगी आणि सून अशा तिघांना आरोग्यसेवा संचालनालयात शासकीय नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. त्याबदल्यात ओसवाल याने २० लाख ७५ हजार घेतले.

पैसे दिले मात्र नोकरी लावून दिली नाही. नोकरी केव्हा मिळेल, अशी वेळोवेळी विचारणा केली असता प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर खोटे पत्र व ऑर्डर दाखवत फसवणूक केली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा अन् भांडण, रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Nashik Crime : खुनांचा आकडा ४३ वर! नाशिकमध्ये विधीसंघर्षित बालकांकडून घातक हल्ले; पोलीस आणि गुन्हेगारांच्या हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक

Anil Parab: मृत्यूनंतर खरंच बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले? अनिल परबांनी फोटो दाखवत कदमांची बुद्धी काढली

"लोक आम्हाला मुद्दाम त्रास द्यायचे" आई-वडिलांच्या घटस्फोटावर व्यक्त झाली मराठी अभिनेत्री; म्हणाल्या..

SCROLL FOR NEXT