railway esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Dadar Railway : धुळे-दादर रेल्वेला 3 महिने एक्सटेन्शन; आठवड्यातून 3 दिवस धावणार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Railway News: धुळ्यासह लगतच्या जिल्ह्यांतील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभत असलेल्या धुळे-दादर रेल्वे सेवेला आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.

७ ऑक्टोबरपासून ही रेल्वेसेवा पुन्हा सुरू होईल. पूर्वीप्रमाणे आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धावेल. तसेच उर्वरित तीन दिवस मनमाड येथून धावेल, अशी अधिसूचना रेल्वे प्रशासनाने काढली आहे.(3 months extension to Dhule-Dadar Railway run 3 days in week dhule railway news)

धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेत खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी यासाठी सतत पाठपुरावा केल्याने रेल्वे प्रशासनाने २९ एप्रिलपासून धुळे-दादर विशेष रेल्वे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली. आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धावते. ही सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला, त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत रेल्वेसेवेला मुदतवाढ देण्यात आली.

दरम्यान, आता आगामी सण-उत्सव लक्षात घेता व प्रवाशांचा प्रतिसाद पाहता रेल्वे प्रशासनाने या रेल्वेसेवेला आणखी तीन महिने अर्थात २ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. पूर्वीप्रमाणे आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धुळ्याहून धावेल. तसेच इतर तीन दिवस मनमाड येथून दादरसाठी धावेल.

०१०६६ धुळे-दादर ही रेल्वे ७ ऑक्टोबरपासून २ जानेवारी २०२४ पर्यंत दर आठवड्याला सोमवार, मंगळवार व शनिवारी धावेल, तर ०१०६५ दादर-धुळे ही रेल्वे ६ ऑक्टोबरपासून १ जानेवारी २०२४ पर्यंत दर आठवड्याला सोमवार, शुक्रवार व रविवारी धावेल.

०२१०२ मनमाड-दादर ही रेल्वे ४ ऑक्टोबरपासून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत बुधवार, शुक्रवार व रविवारी धावेल. ०२१०१ दादर-मनमाड ही रेल्वे ४ ऑक्टोबरपासून २ जानेवारी २०१४ पर्यंत दर आठवड्याला मंगळवार, बुधवार व शनिवारी धावेल. या गाड्यांसाठी बुकिंगदेखील सुरू झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT